AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajendra Gavit : एकीकडे श्रीनिवास वनगांचा भाजप प्रवेश, दुसरीकडे शिंदेंच्या आमदाराचा गंभीर आरोप; महायुतीत नवा वाद?

shrinivas vanga bjp entry : शिंदे गटाचे माजी आमदार श्रीनिवास वनगा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पालघरच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशावर आमदार राजेंद्र गावित यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Rajendra Gavit : एकीकडे श्रीनिवास वनगांचा भाजप प्रवेश, दुसरीकडे शिंदेंच्या आमदाराचा गंभीर आरोप; महायुतीत नवा वाद?
rajendra gavit criticises bjp Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 19, 2026 | 11:28 PM
Share

पालघरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार श्रीनिवास वनगा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यांच्या पक्षप्रवेशावर पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. वनगा यांनी स्वार्थासाठी पुन्हा पक्षप्रवेश केला असावा, असा टोला लगावत गावित यांनी महायुतीत असूनही भाजपकडून शिवसेनेचा केसाने गळा कापला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे वनगा यांच्या पक्षप्रवेशावरून महायुतीतील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

वनगा यांच्या पक्षप्रवेशावर गावितांचा सवाल

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत श्रीनिवास वनगा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने रवींद्र चव्हाण पालघर दौऱ्यावर असताना हा पक्षप्रवेश पार पडला. 2024 पासून वनगा हे शिवसेना शिंदे गटावर नाराज असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी धनुष्यबाण सोडून कमळ हाती घेतलं. मात्र, त्यांच्या या निर्णयावर राजेंद्र गावित यांनी नाराजी व्यक्त केली.

श्रीनिवास वनगा यांच्या पक्षप्रवेशाबाबत बोलताना राजेंद्र गावित म्हणाले की, इतके दिवस पदावर असताना आता पुन्हा पक्षप्रवेश करण्यामागे स्वार्थ असावा. मात्र, कोण कुठे जावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे यावर आपण जास्त काही बोलणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

भाजपवर केला गंभीर आरोप

दरम्यान, पालघर जिल्ह्यात शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या प्रश्नावर बोलताना गावित यांनी भाजपवर निशाणा साधला. महायुतीमध्ये एकत्र असतानाही भाजपकडून केसाने गळा कापला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे श्रीनिवास वनगा यांच्या भाजप प्रवेशामुळे केवळ पक्षीय समीकरणच बदलणार नाही, तर महायुतीतील अंतर्गत नाराजीही समोर येण्याची शक्यता आहे. पालघरच्या राजकारणात या घडामोडींची चर्चा रंगली आहे.

पक्षप्रवेशानंतर काय म्हणाले वनगा?

काही वर्षांपूर्वीच्या राजकीय घडामोडींमुळे आपण भरकटलो होतो, मात्र कार्यकर्ते आणि परिवाराची इच्छा स्वगृही परतण्याची होती, माजी खासदार चिंतामण वनगा आज हयात असते तर आपल्या या निर्णयाने आनंदी झाले असते, कोणत्याही पदाची किंवा अपेक्षेची इच्छा नसून सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Follow Us
दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या....
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांचा समावेश? व्हिडिओ बघाच 
दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती..
Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील जुन्या घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती; पुढील सुनावणी कधी?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?
Manoj Jarange : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?
भाजप आमदार महेश बालदींना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा; निकालानंतर...
Mahesh BaldI : भाजप आमदार महेश बालदींना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा; मात्र निकालानंतर...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय काय?
Maharashtra Drought : आधी पाणी, मग सुशोभीकरण; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्ष..
Shivsena : BJP : शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्षबदलाने पालघरच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना....
Eknath Shinde : हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; पंढरपुरातून रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना
शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन...
Pune : बाळासाहेबांचा अवमान सहन करणार नाही...; शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन
शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
Shivsena Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
GTA 6 Launch : तब्बल 13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ