tv9 Marathi Special Report| जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ; पाहा पूर्ण रिपोर्ट
राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका 7 फेब्रुवारी रोजी पार पडल्या आणि निकालही जाहीर झाले आहेत. महापालिका निवडणुकांनंतर झालेल्या या निवडणुकांमध्येही भाजपचा राज्यभर बोलबाला कायम राहिला आहे. भाजप मोठा पक्ष ठरला असून हा निकाल महाविकास आघाडीच्या पक्षांसाठी मोठा धक्का देणारा ठरला आहे.
राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका 7 फेब्रुवारी रोजी पार पडल्या आणि निकालही जाहीर झाले आहेत. महापालिका निवडणुकांनंतर झालेल्या या निवडणुकांमध्येही भाजपचा राज्यभर बोलबाला कायम राहिला आहे. भाजप मोठा पक्ष ठरला असून हा निकाल महाविकास आघाडीच्या पक्षांसाठी मोठा धक्का देणारा ठरला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने 12 पैकी 7 जिल्हापरिषदांवर सत्ता मिळवली आहे. शिंदेंच्या शिवसेनेला 2 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या पक्षांना जिल्हा परिषदेत फारसे यश मिळाले नाही, फक्त महाविकास आघाडीच्या मदतीने शरद पवार गटाला 1 जिल्हापरिषदेवर सत्ता मिळाली आहे.
पंचायत समितीच्या निकालामध्ये भाजपने 125 पैकी 52 पंचायत समित्यांवर विजय मिळवला आहे. शिंदेंच्या शिवसेनेला 26 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 25 पंचायत समित्यांवर यश मिळाले आहे. शरद पवारांच्या पक्षाला 8 तर काँग्रेसला 8 पंचायत समित्यांवर विजय मिळाला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचा निकाल निकृष्ट असून केवळ 5 पंचायत समित्यांवरच त्यांना सत्ता मिळाली आहे. विधानसभेत महायुतीला 232 आमदारांसह प्रचंड मोठा विजय मिळाला. तेव्हापासून सुरु झालेली विजयी घोडदौड नगरपालिका आणि महापालिकानंतर आता जिल्हापरिषद पंचायत सिमितीमध्येही सुरूच आहे.
Published on: Feb 10, 2026 01:17 PM
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी

