AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SA vs AFG : अफगाणिस्तानसाठी अटीतटीचा सामना, दक्षिण आफ्रिकेचा हिशोब करणार?

South Africa vs Afghanistan T20I World Cup 2026 : अफगाणिस्तान या वर्ल्ड कप मोहिमेत विजयी सुरुवात करण्यात अपयशी ठरली. त्यामुळे अफगाणिस्तानसाठी दुसरा सामना हा फार अटीतटीचा आहे.

SA vs AFG : अफगाणिस्तानसाठी अटीतटीचा सामना, दक्षिण आफ्रिकेचा हिशोब करणार?
Afghanistan Cricket TeamImage Credit source: afghanistan cricket X Account
| Updated on: Feb 11, 2026 | 3:21 AM
Share

अफगाणिस्तान क्रिकेट टीमने गेल्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक दिली होती. अफगाणिस्तानने त्या स्पर्धेत भल्या भल्या संघांना पराभवाचं पाणी पाजत गार केलं होतं. अफगाणिस्तानने न्यूझीलंडसारख्या संघाला पराभूत करत उलटफेर केला होता. मात्र यंदा आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वात अफगाणिस्तानला अपेक्षित सुरुवात करता आलेली नाही. अफगाणिस्तानला या मोहिमेतील आपल्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून 5 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं. न्यूझीलंडने यासह त्या पराभवाची परतफेड केली.

त्यानंतर आता अफगाणिस्तान आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आपला दुसरा सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. अफगाणिस्तानसमोर या दुसऱ्या सामन्यात गतउपविजेता दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे. याच दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला गेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत पराभूत करत अंतिम फेरीत धडक दिली होती. त्यामुळे आता अफगाणिस्तानकडे 2 वर्षानंतर उपांत्य फेरीतील पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. तर न्यूझीलंड आपली विजयी घोडदौड कायम राखुन सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. अशात या सामन्यात कोण मैदान मारतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

अफगाणिस्तानची पराभवाने सुरुवात

न्यूझीलंडने 8 फेब्रुवारीला अफगाणिस्तानवर 5 विकेट्सने मात केली होती. न्यूझीलंड अफगाणिस्तानकडून विजयासाठी मिळालेलं 183 धावांचं आव्हान हे 17.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं होतं. त्यामुळे आता अफगाणिस्तानला सुपर 8 मध्ये पोहचायचं असेल तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवावा लागणार आहे. अफगाणिस्तानने हा सामना गमावल्यास त्यांची सुपर 8 फेरीची वाट बिकट होईल. तसेच दक्षिण आफ्रिकेचा विजयासह सुपर 8 चा दावा आणखी मजबूत होईल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव झाल्यास अफगाणिस्तानला सुपर 8 फेरीपर्यंत पोहचण्यासाठी उर्वरित सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवण्याची वेळ येईल. त्यामुळे अफगाणिस्तानसाठी हा सामना करो या मरो अशा पद्धतीचाच झाला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

दक्षिण आफ्रिका अफगाणिस्तान विरुद्ध अजिंक्य

आतापर्यंत दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात एकूण 3 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिकेने या तिन्ही सामन्यात अफगाणिस्तानवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आकड्यांबाबत दक्षिण आफ्रिका अफगाणिस्तानवर वरचढ असल्याचं स्पष्ट होतं.

सामन्याबाबत सर्वकाही माहिती

सामना किती वाजता?

उभयसंघातील सामन्याला 11 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता सुरुवात होणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

Follow Us
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी खाद्य तेलाबाबत घोषणा केलीच...
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी घोषणा केलीच...  खाद्य तेलाबाबत एफडीएकडून कडक नियमावली
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरेंवर
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरे गटावर निशाणा!
पोलिस संरक्षण काढून ये मग... फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर,
Video : पोलिस संरक्षण काढून ये मग...  फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर, थेट बुलेटस्वारी करत स्वीकारलं चॅलेंज
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत, असं काही घडलं की...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कोर्टात काय...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कामत यांचा युक्तिवाद, ठाकरेंना जिंकून देणार?