भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत शेतकऱ्यांना 50 हजारांपासून 1 लाखापर्यंत मदत, शासनाची तीन वर्षे आर्थिक मदत

| Updated on: Mar 04, 2021 | 4:55 PM

राज्य सरकारनं 2018-19 पासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरु केलीय. Bhausaheb Fundkar Falbaag Lagvad Yojana

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत शेतकऱ्यांना 50 हजारांपासून 1 लाखापर्यंत मदत, शासनाची तीन वर्षे आर्थिक मदत
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

मुंबई: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं राहणीमान उंचवावं, त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडावी म्हणून राज्य सरकार नेहमी प्रयत्न करतं. केंद्र सरकारनंही 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं धोरण स्वीकारलं आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी राज्य सरकारनं 2018-19 पासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरु केलीय. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना उत्पन्न मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. (Bhausaheb Fundkar Falbaag Lagvad Yojana Full Details )

शेतकऱ्यांकडे जमीन किती असावी?

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे किमान 20 गुंठे जमीन असणं आवश्यक आहे. तर, कोकणासाठी ही अट शिथील करण्यात आली असून तेथील शेतकऱ्यांना 10 गुंठे जमीन असली तरी या योजनेचा लाभ दिला जातो. कोकणातील कमाल जमीन धारणा मर्यादा 6 हेक्टर तर उर्वरित महाराष्ट्रासाठी ही मर्यादा 10 हेक्टर पर्यंत आहे. योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्याला उपलब्ध क्षेत्रात एकापेक्षा जास्त फळपिकांची लागवड करता येते. राज्य शासनाच्या इतर फळबाग योजनेंचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजनेला लाभ घेता येत नाही.

पात्रतेचे निकष

वैयक्तिक शेतकरी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी अर्ज करु शकेल. शेतकऱ्याच्या नावावर 7/12 असणं आश्यक आहे. शेतकऱ्याचं कुटुंब केवळ शेतीवर अवलंबून असेल त्यांना प्रथम प्राधान्य दिलं जाते. अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, अल्पव व अत्यल्प भूधारक, महिला आणि दिव्यांग व्यक्ती यांना या योजनेत प्राधान्य दिले जाते.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी शेतकऱ्यांनी करायची कामं

शेतकऱ्यांना जमीन तयार करणे, माती व शेणखत, सेंद्रिय खत मिश्रणानं खडडे भरणे, रासयानिक खतांचावापर आणि आतंरमशागत करणे. काटेरी झाडांचे कुंपण करणे हे काम ऐच्छिक स्वरुपातील आहे.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी शासनाचं योगदान

खड्डे खोदणे, कलमे लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे यासाठी शासन अर्धसहाय्य करते. या योजनेअतंर्गत फळबाग लागवड करायची असल्यास 1 मे 30 नोव्हेंबर दरम्यान करावी लागते. योजना यशस्वी होण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागच्या कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारीस विभागीय कृषी सहसंचालक, कृषी आयुक्तालय, रोपवाटिकाधारक यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.

योजनेत समाविष्ट असलेली फळपिके

नारळ, काजू, पेरू, डाळींब, संत्रा, मोसंबी, कांदी लिंबू, सिताफळ, आवळा,चिंच, जांभूळ, फणस, अंजिर,चिकूस, आंबा, कोकम

शेतकऱ्यांना तीन टप्प्यात अनुदान

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी शेतकऱ्यांना तीन टप्प्यात अनुदानाची रक्कम दिली जाते. पहिल्या वर्षी 50 टक्के, दुसऱ्या वर्षी 30 आणि तिसऱ्या वर्षी 20 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते. फळपिकानुसार अनुदानाची रक्कम बदलते. तर, दरवर्षी एप्रिल महिन्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी वृत्तपत्रात आणि इतर माध्यमात जाहिरात दिली जाते आणि शेतकऱ्यांकडून अर्ज भरुन घेतले जातात.


संबंधित बातम्या:

मुंबई बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांचे काम बंद आंदोलन, शेतमालाच्या गाड्यांच्या रांगा

शेतकऱ्यांसाठी खुशखबर!, डीएपीच्या किमती जैसे थे, ‘या’ कंपनीचा मोठा निर्णय

(Bhausaheb Fundkar Falbaag Lagvad Yojana know full details)