मुंबई बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांचे काम बंद आंदोलन, शेतमालाच्या गाड्यांच्या रांगा

माथाडी कामगारांनी काम बंद केल्यानं बाजारसमित्यांमध्ये आलेल्या शेतमालाच्या गाड्यांच्या रांगा लागल्या. Mathadi workers stopped work

मुंबई बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांचे काम बंद आंदोलन, शेतमालाच्या गाड्यांच्या रांगा
माथाडी कामगारांचं काम बंद आंदोलन
Follow us
| Updated on: Mar 04, 2021 | 12:36 PM

नवी मुंबई: आशियातील सर्वात मोठी बाजारसमिती समजल्या जाणाऱ्या मुंबई एपीएमसीमध्ये माथाडी कामगारांनी काम बंद केलं आहे. माथाडी कामगारांनी काम बंद केल्यानं बाजारसमित्यांमध्ये आलेल्या शेतमालाच्या गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत. विक्री करण्यात आलेल्या मालाचे वजन 50 किलोपेक्षा जास्त असल्यानं काम बंद करण्यात आलं आहे. (Mathadi workers stopped work in Onion Market in Mumbai APMC)

कांदा मार्केटमध्ये नियमाचं उल्लंघन

शेतमालाच्या गोणीचं वजन 50 किलोंपेक्षा अधिक असू नये, असा नियम करण्यात आला आहे. हा नियम फळ मार्केट, भाजीपाला मार्केट, मसाला मार्केट व दाणा मार्केटमध्ये लागू करण्यात आला आहे. फळ मार्केट, भाजीपाला मार्केट आणि मसाला मार्केट, दाणा मार्केटमध्ये या नियमांची अंमलबजावणी करण्यात येते. मात्र, कांदा बटाटा मार्केटमध्ये अंमलबजावणी होत नसल्यानं माथाडी कामगार आक्रमक झाले. आणि त्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं.

एपीमएसी प्रसासनावर आरोप

एपीएमसीमधील कांदा बटाटा मार्केटमध्ये माथाडी कामगारांनी अचानकपणे काम बंद केले. त्यांनी यावेळी विक्री करण्यात येणाऱ्या मालाच्या गोण्यांचे वजन 50 किलो पेक्षा जास्त असल्याने काम बंद करण्याचा निर्णय घेतला. एपीएमसी प्रशासन व व्यापारी यासंदर्भातील शासन आदेशाकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप देखील यावेळी करण्यात आला.

कांदा मार्केटमध्ये नियम लागू करण्याची मागणी

50 किलो वजनाच्या गोणी संदर्भातील नियम अद्याप कांदा मार्केटमध्ये लागू करण्यात आला नसल्याने माथाडी वर्गात प्रचंड नाराजी होती. त्यामुळे 50 किलो पेक्षा अधिक वजनाची गोण उचलणार नसल्याचे सांगत माथाडी कामगारांनी कांदा बटाटा मार्केट मध्ये काम बंद आंदोलन पुकारलेय. आज कांदा बटाटा मार्केटमध्ये जवळपास 150 गाड्याची आवक झालीय. शेतमालाच्या गाड्या धक्क्यावर उभ्या आहेत.

कांदा मार्केटमधील माथाडी कामगारांच्या काम बंद आंदोलनावर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन काय तोडगा काढणार हे पाहावं लागणार आहे.

कांद्यांनं पन्नाशी ओलांडली, सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार?https://t.co/6YI7vbByDk#onionrates | #onion | #onionratehike | #Agrinews | #farmstories

— TV9 Marathi (@TV9Marathi) February 11, 2021

संबंधित बातम्या:

माजी विद्यार्थीच बनला कुलगुरु, डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पदभार स्वीकारला

द्राक्ष उत्पादक आणि व्यापाऱ्यांनाही कोरोनाचा फटका, मुंबई फळ मार्केटमध्ये भावात मोठी घसरण

मुंबई एपीएमसी फळ बाजारात देवगड हापूसची आवक वाढली, दर मात्र चढेच

(Mathadi workers stopped work in Onion Market in Mumbai APMC)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.