मुंबई एपीएमसी फळ बाजारात देवगड हापूसची आवक वाढली, दर मात्र चढेच

मुंबई एपीएमसी फळ बाजारात देवगड हापूसची आवक वाढल्याचे दिसून आले मात्र, आंब्याचे दर चढेच आहेत. Alphonso Mango Navi Mumbai APMC

मुंबई एपीएमसी फळ बाजारात देवगड हापूसची आवक वाढली, दर मात्र चढेच
देवगड हापूस
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 5:11 PM

नवी मुंबई: मुंबई एपीएमसी फळ बाजारात देवगड हापूसची आवक वाढल्याचे दिसून आले. मात्र, आंब्याचे दर चढेच आहेत. जवळपास 1200 पेटी देवगड हापूस तर 2500 क्रेट कर्नाटक आंबा बाजार समितीमध्ये दाखल झाला. हापूस आंब्याच्या पाच डझनाच्या पेटीला 5000 ते 8000 रुपये भाव मिळाला तर कर्नाटक आंब्याला तीन हजार ते पाच हजार प्रती क्रेट इतका दर मिळाला आहे. (Alphonso Mango and Karnataka Mango rates increased in Navi Mumbai APMC)

अवकाळी पावसाचा फटका

अवकाळी पावसामुळे रत्नागिरी आणि देवगड परिसरात आंबा पीक कमी आले आहे. एप्रिल ते मे महिन्यात मोठ्या प्रमाणात आंबा आवक वाढेल, अशी आशा आहे. आंबा सामानांच्या आवाक्यात लवकर येणाच्या अंदाज दिसत नाही.

देवगड हापूसची आवक वाढली, दर मात्र चढेच

फळांचा राजा आंबा मुंबई एपीएमसी बाजारात येऊ लागल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याची आवक बाजारात हळूहळू वाढू लागलीय. जवळपास हापूस 1200 पेटी तर 2500 क्रेट कर्नाटकचा आंबा बाजारात आला आहे. तर मार्च महिना मध्यावर असातना आंब्याची आवक वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

देवगडची पेटी 5 ते 8 हजाराला

सध्या देवगड हापूस पाच डझनाच्या पेटीला 5 हजार ते हजार रुपये भाव मिळत आहे. तर, कर्नाटकी आंबा तीन हजार ते पाच हजार प्रती क्रेट विकला जात आहे. दिवसेंदिवस आंबा बाजारात वाढेल परंतू आंब्याचे दर मात्र लवकर कमी होतील असे वाटत नाही. त्यामुळे अजून महिनाभर तरी आंबा सामान्य नागरिकांच्या आवाक्यात येणार नसल्याचे अंदाज व्यक्त केला जात आहे.

अवकाळी पावसामुळे रत्नागिरी आणि देवगड परिसरात आंबा पीक कमी असल्याचे बोलले जात आहे. तर, एप्रिल ते मे महिन्यात मोठ्या प्रमाणात आंबा आवक वाढेल. त्यावेळी मात्र आंबा सामानांच्या आवाक्यात येऊ शकतो. असा अंदाज व्यापारी विजय ढोले यांनी व्यक्त केला. .

फवारणीचा खर्च वाढणार

वातावरणातील बदल आणि पावसामुळे आंब्याच्या मोहोरावर रोगांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. त्यामुळे फवराणीचा खर्चाची भर पडणार आहे. सध्या हवामानातील बदलामुळे पालवीला मोहोर आलेला नाही. तर १५ मे नंतरच्या आंब्यावर संक्रांत येण्याची चिन्हे आहेत त्यामुळे आंबा बागायतदार धास्तावलाय.

आंबा धोक्यात का आलंय त्याची कारणे

आंबा बागायतदार तुकाराम घवाळी हापूस आंब्याला थंडी गायब झाल्यानं अपेक्षित मोहोर आलेला नाही. सध्या सुरु असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीसह ढगाळ वातावरणामुळे मोहोरातून तयार झालेली कणी गळून जाणार आहे. पाऊस आणि उन्हाळा आंब्याच्या मोहोराला धोकादायक वातावरण समजले जाते. त्यामुळे पालवीला मोहर फुटण्याची शक्यता कमी असल्याचे तुकाराम घवाळी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

PM Kisan: 2.89 कोटी शेतकरी किसान सन्मान योजनेपासून वंचित, तुम्हाला पैसे मिळाले का?

पीएम किसान सन्मान : 60 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले 2 हजार रुपये, तुम्हाला मिळाले का?

(Alphonso Mango and Karnataka Mango rates increased in Navi Mumbai APMC)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.