AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र पालथा घातला असता तर...; राऊतांनी 'सामना'त ठाकरे बंधूंचे कान टोचले

महाराष्ट्र पालथा घातला असता तर…; राऊतांनी ‘सामना’त ठाकरे बंधूंचे कान टोचले

| Updated on: Feb 15, 2026 | 11:26 AM
Share

सामनातील रोखठोक सदरात संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील कामगिरीवर कान टोचले आहेत. महाराष्ट्रात भाजप आणि शिंदे गटाने मिळवलेल्या यशाचे विश्लेषण करताना, राऊतांनी विरोधी पक्षांमध्ये लढण्याची भूक कमी झाल्याचे नमूद केले. त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी तलवारीला तलवार भिडवणारे नेतृत्व महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.

संजय राऊत यांनी सामनातील आपल्या रोखठोक सदरातून ठाकरे बंधूंच्या कार्यपद्धतीवर परखड मत व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, जर ठाकरे बंधूंनी महाराष्ट्र पालथा घातला असता, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील निकालाचे आकडे नक्कीच बदलले असते. या निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी विजयाची हॅट्ट्रिक केली असून, विरोधी पक्षांना आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे राऊतांनी अधोरेखित केले.

निवडणुका लढण्याची आणि जिंकण्याची भूक राजकीय पक्षांच्या नेतृत्वात असायलाच हवी. ही भूक सध्या भाजप, शिंदे गट आणि अजित पवारांच्या पक्षात सर्वाधिक दिसत असल्याचे राऊतांनी नमूद केले. महाराष्ट्राच्या राजकारणात तलवारीला तलवार भिडवणारे नेतृत्वच यापुढे टिकेल, असेही त्यांनी म्हटले आहे. विरोधकांनी मुंबई आणि इतर काही महापालिका वगळता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गांभीर्याने घेतल्या नाहीत, असे या लेखात विश्लेषण केले आहे.

Published on: Feb 15, 2026 11:26 AM