PM Kisan: 2.89 कोटी शेतकरी किसान सन्मान योजनेपासून वंचित, तुम्हाला पैसे मिळाले का?

ही योजना सुरु झाल्यापासून 11.61 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. मात्र, 2.89 कोटी शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. PM kisan Samman Nidhi

Yuvraj Jadhav

|

Feb 21, 2021 | 6:59 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्याची तयारी सुरु झाली आहे. ही योजना सुरु झाल्यापासून 11.61 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. मात्र, 2.89 कोटी शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. शेतकऱ्यांना या योजनेला लाभ न मिळण्याची काय कारणं आहेत. सन्मान योजनेच्या यादीत तुमचं नाव नसेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करु शकता. त्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे जाण्याची गरज नाही. (PM kisan Samman nidhi 2 crore eighty nine lakhs farmers not get money)

किसान सन्मान योजनेसाठी कशी नोंदणी करणार

जर तुम्ही पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या यादीत असाल तर पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर भेट द्या. तिथे योजनेवर क्लिक करा. त्यानंतर Farmers Corners या पर्यायवर क्लिक करा. तिथे New Farmer Registration वर क्लिक करा. यानंतर नव्यान उघडल्या जाणाऱ्या विंडोमध्ये आधार कार्ड आणि कॅप्चा टाका. यानंतर तुमची माहिती मिळाली नाहीतर ‘RECORD NOT FOUND…DO YOU WANT TO REGISTER…असा मेसेज समोर आल्यास YES पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर नवीन अर्ज ओपन होईल. तिथे सर्व माहिती योग्य प्रकारे भरुन घ्यावी. बँक खाते क्रमांकासह IFSC कोड व्यवस्थित भरा. यानंतर जमीनीची माहिती भारावी लागेल. यानंतर नोंदणी क्रमांक मिळेल. तो क्रमांक आपल्याकडे जपून ठेवावा. कृषी विभागाकडून तुमचा अर्ज व्हेरिफाय केला जाईल आणि नंतर शेतकऱ्यांना पैसे मिळतील.

60.50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर सातव्या हप्त्यातील रक्कम जमा

पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत 60.50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर सातव्या हप्त्यातील दोन हजार जमा करण्यात आले आहेत. नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबर 2020 ला सातवा हप्ता जारी केला होता. तेव्हापासून आतापर्यंत 60 लाख 50 हजार 280 शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. मार्च महिन्यापर्यंत आणखी 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार जमा केले जाणार आहेत.

दरदिवशी 1 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबर 2020 ला 9 कोटी शेतकऱ्यांच्या कात्यावर 18 हजार कोटी ट्रान्सफर केले होते. त्यानंतर 58 दिवसांमध्ये कृषी विभागानं 60 लाख 50 हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 रुपये पाठवले आहेत. दरदिवशी 1 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवले जात आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. त्यांनी पीएम- किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटवर जाऊन त्यांचं रेकॉर्ड चेक करणं गरजेचे आहे. पीएम किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 21 फेब्रुवारीपर्यंत 11.64 कोटींवर पोहोचली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ज्यांची कागदपत्रे व्यवस्थित आहेत. त्या शेतकऱ्यांची ही संख्या आहे. या योजनेद्वारे सरकारचा शेतकऱ्यांना त्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न आहे.

संबंधित बातम्या:

पीएम किसान सन्मान : 60 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले 2 हजार रुपये, तुम्हाला मिळाले का?

कामधेनू दत्तक ग्राम योजनेमार्फत शेतकऱ्यांना मोफत बियाणे व औषधे वाटप, कामधेनू योजना कोण राबवतं?, वाचा सविस्तर

(PM kisan Samman nidhi 2 crore eighty nine lakhs farmers not get money)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें