AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tejas Thackeray Hospitalized: उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

Tejas Thackeray Hospitalized: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांच्यावर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

Tejas Thackeray Hospitalized: उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Tejas ThackerayImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 15, 2026 | 12:11 PM
Share

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं. तेजस यांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यांच्या सर्व चाचण्या केल्यानंतर तेजस यांना आता बरे वाटू लागल्याचं सांगितलं जात आहे. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे रुग्णालयात तेजस यांच्यासोबत असल्याचंही सांगितलं जात आहे.

तेजस ठाकरेंवर उपचार सुरु

उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. अचानक तब्येत बिघडल्यामुळे तेजस ठाकरेंना बुधवारी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तेजस ठाकरेंची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

उद्धव ठाकरेंची रुग्णालयात जाऊन डॉक्टरांशी चर्चा

तेजस ठाकरे बुधवारी सायंकाळी मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले होते. बुधवारी रात्री उद्धव ठाकरेंनी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांशी चर्चा केली. त्यानंतर प्रकृतीची माहिती घेतली. यानंतरही उद्धव ठाकरे एकदा-दोनदा रुग्णालयात गेले आणि डॉक्टरांकडे प्रकृतीची विचारपूस केली. सध्या तेजस ठाकरेंच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर येत आहे. तेजस ठाकरेंना उद्या किंवा परवा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कोण आहेत तेजस ठाकरे?

तेजस ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे धाकले चिरंजीव आहेत. तेजस ठाकरे हे शिवसेनेच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात. प्रचारात भाग घेतात. मात्र, त्यांनी अधिकृतपणे सक्रिय राजकारणात भाग घेतलेला नाही. तेजस ठाकरे हे वाइल्डलाइफ रिसर्चर आणि फोटोग्राफर आहेत. त्यांचं वाइल्डलाइफ फिल्डमधील काम अत्यंत मोठं आहे. तामिळनाडूत भारतीय रिसर्च टीमने गेकोची एक नवीन प्रजाती शोधली होती. रात्रभर जागणारी आणि अधिक बोलणारी ही पाल आहे. गर्मीच्या ठिकाणी ही पाल आढळते. या प्रजातीला तेजस ठाकरेंच्या नावावरून नाव दिलं आहे.

तेजस ठाकरे यांना ‘TT’ म्हणूनही संबोधलं जातं. तेजस यांनी 2012मध्ये एम्फिबियन आणि रेप्टाइल्सचा शोधात अंबोलीत पहिली हर्पिंग ट्रिप काढली होती. त्यावेळी त्यांचं वय खूप छोटं होतं. या ट्रिपच्यावेळी माश्याची नवीन स्पीशीज सापडली. या प्रजातीचं नाव नंतर शिस्तुरा हिरण्यकेशी ठेवलं गेलं.

2017मध्ये ते अंबोलीला आले होते. त्यांनी या माश्याचं डॉक्युमेंटेशन करण्यासाठी सर्व परवानग्या घेतल्या होत्या. तेजस यांनी 2021मध्ये कोव्हिड लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण प्रक्रिया जाहीर केली होती. अंबोलीच्या शिव मंदिरातील तलावात त्याने हा मासा पाहिला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिस्तुरा हिरण्यकेशी बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साईट टॅग मिळाला होता. आतापर्यंत त्यांनी 60 स्पेशीज शोधल्या ाहेत.

तेजस ठाकरे यांनी एकदा मीडियाशी संवाद साधताना मार्मिक भाष्य केलं होतं. मी दसरा रॅलीतही अनेकदा सहभागी झालो. मी पूर्ण महाराष्ट्र फिरलोय. पण लोकांनी मला कधी नोटीस केलं नाही. पण मला गर्दी आणि रॅलींपेक्षा जंगल सर्वाधिक आवडते, असं तेजस ठाकरे म्हणाले होते.

Follow Us
मीरा भाईंदर महापालिकेकडून सार्वजनिक कुर्बानी, बकरा पाळण्यावर निर्बंध
मीरा भाईंदरमध्ये सार्वजनिक ठिकाणी बकरा पाळणे आणि कुर्बानीवर बंदी
राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... सिब्बल
Shivsena Hearing | राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद ठरणार गेम चेंजर?
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे...
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे दुर्लक्ष...काळीज पिळवटून टाकणारी दृश्य
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ: DA आता 60 टक्क्यांवर
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा
ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय घडतंय?
E20 पेट्रोलबाबत मोठी अपडेट समोर! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय....
E20 पेट्रोलबाबत मोठी अपडेट समोर! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत, अखेर...
लवकरच केंद्रात दोन डझन मंत्री बदलणार, शिंदेंनाही हवय कॅबिनेट
शिंदेंनाही हवंय आणखी एक कॅबिनेट, लवकरच केंद्रात दोन डझन मंत्री बदलणार?
बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाख खर्च
Ritu Tawde : बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च, नेमकं सत्य काय?
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... बड्या नेत्याचे विधान
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या चर्चा, दुसरीकडे बड्या नेत्याचे सुचक विधान