राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला ब्रेक पण एक खिडकी खुली?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा विषय तूर्तास थांबला आहे. प्रफुल्ल पटेल आणि शशिकांत शिंदे यांनी सध्या विलीनीकरण होणार नाही असे स्पष्ट केले आहे. मात्र, दुसऱ्या गटाकडून प्रस्ताव आल्यास चर्चेसाठी दरवाजे खुले असल्याचे संकेत सुनील तटकरे आणि शशिकांत शिंदे यांनी दिले आहेत. भविष्यात सुनेत्रा पवारांची भूमिका महत्त्वाची ठरेल असेही म्हटले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेला सध्या ब्रेक लागला आहे. प्रफुल्ल पटेल आणि शशिकांत शिंदे यांनी विलीनीकरण होणार नाही आणि कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले आहे. १२ फेब्रुवारी रोजी विलीनीकरण निश्चित झाल्याचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले होते, मात्र ती तारीख उलटून गेल्यानंतर आशा मावळल्याचे चित्र आहे.
अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांतील चर्चा दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे, तर शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांनी विलीनीकरणासाठी पुढाकार घेणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, याच वेळी दोन्ही बाजूंकडून भविष्यात चर्चेसाठी एक खिडकी खुली ठेवण्यात आली आहे. सुनील तटकरे यांनी पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रस्ताव आल्यास चर्चा होईल असे म्हटले, तर शशिकांत शिंदे यांनी सुनेत्रा पवारांनी ठरवून प्रस्ताव दिल्यास चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. याचा अर्थ पहिले आपण अशी भूमिका दोन्ही बाजूंकडून घेतली जात आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे एक होणे तूर्तास टळले असले तरी, भविष्यातील राजकीय घडामोडींमध्ये सुनेत्रा पवारांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.
Published on: Feb 15, 2026 10:25 AM
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता
