कोकणावरील संकटांची मालिका सुरुच, निसर्ग चक्रीवादळानंतर अवकाळी पावसानं हापूस धोक्यात, मच्छीमारही संकटात

अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे फळांचा राजा हापूस आंब्याचे पिक धोक्यात आलंय. Alphonso Mango producer Farmer

  • मनोज लेले, टीव्ही 9 मराठी, रत्नागिरी
  • Published On - 16:12 PM, 20 Feb 2021
कोकणावरील संकटांची मालिका सुरुच, निसर्ग चक्रीवादळानंतर अवकाळी पावसानं हापूस धोक्यात, मच्छीमारही संकटात
कोकणातील आंबा उत्पादक आणि मच्छीमार संकटात सापडलेत

रत्नागिरी: कोकणावरील संकटाची मालिका काही थांबत नसल्याचं चित्र आहे. सुरुवातीला निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका कोकणातील नागरिकांना बसला. आता अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे फळांचा राजा हापूस आंब्याचे पिक धोक्यात आलंय. सध्या ढगाळ हवामानामुळे आलेल्या मोहोर टिकवायचा कसा हे मोठं आव्हान आंबा बागायतदारांसमोर असणार आहे. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत. वादळी वाऱ्यामुळे मच्छिमारी नौका बंदरातच उभ्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे, जयगड, मिरकरवाडा, नाट्ये अशा बंदरात सध्या नौका उभ्या आहेत. (Alphonso Mango producer Farmer facing problems due to climate change)

फवारणीचा खर्च वाढणार

वातावरणातील बदल आणि पावसामुळे आंब्याच्या मोहोरावर रोगांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. त्यामुळे फवराणीचा खर्चाची भर पडणार आहे. सध्या हवामानातील बदलामुळे पालवीला मोहोर आलेला नाही. तर १५ मे नंतरच्या आंब्यावर संक्रांत येण्याची चिन्हे आहेत त्यामुळे आंबा बागायतदार धास्तावलाय.

आंबा धोक्यात का आलंय त्याची कारणे

आंबा बागायतदार तुकाराम घवाळी हापूस आंब्याला थंडी गायब झाल्यानं अपेक्षित मोहोर आलेला नाही. सध्या सुरु असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीसह ढगाळ वातावरणामुळे मोहोरातून तयार झालेली कणी गळून जाणार आहे. पाऊस आणि उन्हाळा आंब्याच्या मोहोराला धोकादायक वातावरण समजले जाते. त्यामुळे पालवीला मोहर फुटण्याची शक्यता कमी असल्याचे तुकाराम घवाळी यांनी सांगितले.

मासेमारीवर संकट

समुद्रातील वादळ सदृष्य परिस्थितीचा परिणाम कोकणातल्या मासेमारीवर झाल्याचे पाहायला मिळाले. वादळी वाऱ्यामुळे मच्छिमारी नौका बंदरातच उभ्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे, जयगड, मिरकरवाडा, नाट्ये अशा बंदरात सध्या नौका उभ्या आहेत. समुद्रातील वादळ सदृष्य परिस्थितीमुळे मच्छीमारांचे 6 कोटींचे नुकसान झालंय. पंधरवड्यापासून समुद्रातील पाण्याला करंट त्यामुळे मासेमारीची जाळी रिकामी आहेत. गेल्या तीन दिवसांपासून समुद्रात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मच्छिमार हवालदिल झाल्याचे चित्र आहे.

कोरोना ते अवकाळी संकटांची मालिका सुरुच

कोकणातील मच्छीमारांसमोरील संकटांची मालिका थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे जवळपास चार ते पाच महिने मच्छीमारीचा व्यवसाय बंद राहिला होता. कोरोना संकटामध्येच निसर्ग चक्रीवादळानं कोकणाला झोडपले. आता वादळ सदृष्य परिस्थिती असल्यानं रत्नागिरीतील मच्छीमारांचं 6 कोटींचे नुकसान झाले आहे.

संबंधित बातम्या:

Alphonso Mango producer Farmer facing problems due to climate change

(Alphonso Mango producer Farmer facing problems due to climate change)