AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी विद्यार्थीच बनला कुलगुरु, डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पदभार स्वीकारला

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा पदभार डॉ. प्रशांतकुमार पाटील(Dr. Prashantkumar Patil) यांनी स्वीकारला.

माजी विद्यार्थीच बनला कुलगुरु, डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पदभार स्वीकारला
डॉ.प्रशांतकुमार पाटील
| Updated on: Mar 02, 2021 | 7:37 PM
Share

अहमदनगर: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा पदभार डॉ. प्रशांतकुमार पाटील(Dr. Prashantkumar Patil) यांनी स्वीकारला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ही नियुक्ती केली. प्रशांतकुमार पाटील यांची नियुक्ती 5 वर्षांच्या काळासाठी करण्यात आली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कार्यक्षेत्र 10 जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे. कृषी क्षेत्रासाठी अद्यायावत तंत्रज्ञान अत्यंत आवश्यक असुन राहूरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या नावलौकिकाप्रमाणे या विद्यापीठाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी काम करणार असल्याचं पाटील यांनी सांगितले. (Dr. Prashankumar Patil take charge of Vice Chancellor post of Mahatma Phule Krishi Vidyapith, Rahuri)

ग्लोबल ब्रँड तयार करणार

सर्वांच्या सहकार्याने महात्मा फुले कृषी विद्यापीठ हा ग्लोबल ब्रँड तयार करणार असल्याची ग्वाही नवनियुक्त कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी दिली.महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. पाटील स्वागत समारंभात सर्वांना उद्देशून बोलत होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठ पुन्हा एकदा गरूडझेप घेईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. वर्ग किंवा मनुष्यबळ नाही म्हणून चालणार नाही. जोपर्यंत प्रश्न निकाली निघेपर्यंत यंग प्रोफेशनल स्किमच्या माध्यमातून तरूणांना संधी देवून मार्ग काढू, असं कुलगूरू डॉ.प्रशांतकुमार पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण हे होते. यावेळी पंजाब राज्य शासनाचे कर विभागाचे आयुक्त निळकंठ आव्हाड, विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संशोधन आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, कुलसचिव श्री. मोहन वाघ आणि माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. हरी मोरे उपस्थित होते.

डॉ. प्रशांतकुमार पाटील कोण आहेत?

डॉ.प्रशांतकुमार पाटील हे भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मुंबई येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक म्हणून काम करत होते. डॉ.प्रशांतकुमार गुलाबराव पाटील यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठातून कृषि अभियांत्रिकी या विषयात बी.टेक पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी आयआयटी खडकपूर येथून एम.टेक. व त्यानंतर नागपूर येथील व्हीएनआयटी येथून पीएच.डी प्राप्त केली आहे.

पाच वर्षांसाठी नियुक्ती

डॉ.प्रशांतकुमार गुलाबराव पाटील यांची राहुरी, जि अहमदनगर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी (दि. 27 फेब्रुवारी) पाटील यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती जाहीर केली. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. के.पी. विश्वनाथ कार्यकाळ संपल्यानंतर सेवानिवृत्त झाले. डॉ. विश्वनाथ यांचा कार्यकाळ 4 नोव्हेंबर 2020 रोजी पूर्ण झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांचेकडे पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं 10 जिल्हयात कार्यक्षेत्र

सध्या महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना 1969 मध्ये झाली. सध्या या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र जळगाव, नंदुरबार, धुळे , नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात विस्तारलेले आहे.

संबंधित बातम्या:

माजी विद्यार्थीच बनला महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा कुलगुरु; डॉ. प्रशांतकुमार पाटील यांची नियुक्ती

शरद पवार आता फुले, शाहू, आंबेडकरांच्या पंक्तीत विराजमान- जयंत पाटील

पक्षवाढीसाठी राज ठाकरेंनी फिरलं पाहिजे; चंद्रकांतदादांचा सल्ला

(Dr. Prashankumar Patil take charge of Vice Chancellor post of Mahatma Phule Krishi Vidyapith, Rahuri)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.