चंद्रपूरच्या शेतकऱ्याची मिश्र शेतीमध्ये योग्य नियोजनाची सांगड; 7 एकरांमध्ये नवनव्या प्रयोगांनी प्रगती

| Updated on: Feb 11, 2021 | 3:05 PM

चिनोरा गावातील प्रगतीशील शेतकरी पांडुरंग डोंगरकर यांनी मिश्र शेतीला प्रयोगांची जोड देत प्रगती साधलीय. (Chinora Pandurang Dongarkar Mix Farming)

चंद्रपूरच्या शेतकऱ्याची मिश्र शेतीमध्ये योग्य नियोजनाची सांगड; 7 एकरांमध्ये नवनव्या प्रयोगांनी प्रगती
पांडुरंग डोंगरकर
Follow us on

चंद्रपूर : शेतीचे योग्य नियोजन करणे काळाची गरज बनलीय हे ओळखून चंद्रपूर जिल्ह्यातील पांडुरंग डोंगरकर यांनी शेतीमध्ये प्रगती साधलीय.  7 एकरात विविध उत्पन्नाचे प्रयोग करुन डोंगरकर शेतीमध्ये यश मिळवत आहेत. बकरी पालन, कुकुट पालन, गो पालन ,यामुळे बहरली शेती ,मशागत करण्यासाठी आधुनिक ट्रॅक्टर ,ट्रिलरचा ते वापर करतात. (Chandrapur Pandurang Dongarkar success story of mix farming)

मिश्र शेतीवर भर

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरालगत लागून असलेल्या चिनोरा या गावात 68 वर्षीय पांडुरंग डोंगरकर हे राहतात. दोन एकर शेतीमध्ये विविध प्रकारचे पिके घेऊन गेल्या 20 वर्षापासून आपला परिवार ते चालवत आहेत. त्यांच्याकडे एकूण सात एकर शेती असून दोन एकरामध्ये फळबाग व भाजीपाला घेऊन वर्षाकाठी लाखोचे उत्पादन ते काढतात. व उर्वरित पाच एकर शेतीमध्ये हळद व पारंपरिक पिके ते घेत आहेत.

शेतीच्या उत्कृष्ट नियोजनाचं उदाहरण

शेतीच्या उत्कृष्ट नियोजनाचा नमुना या ठिकाणी पाहायला मिळाला. वरोरा येथील कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार व योजनेनुसार त्यांनी आपल्या शेतीचे नियोजन केले. यामध्ये त्यांनी एक छोटी नर्सरी सुद्धा तयार केली. यामध्ये शेतकऱ्यांना आवश्यक असणारे रोपे ते तयार करून विकतात. व उर्वरित रोपे आपल्या शेतात सुद्धा लावतात.

पांडुरंग डोंगरकर यांच्या शेतीमध्ये बकरी पालन, कुक्कुट पालन, गो पालन सुद्धा आहे. यांच्या शेणापासून ते स्वतः खत बनवॉतात. त्यामुळे या दोन एकरच्या शेती मध्ये ऑरगॅनिक पद्धतीने लागवड करून उत्पादन काढतात. यामध्ये प्रामुख्याने बोर, पेरू, मोसंबी यांचा समावेश आहे. भाजीपाला लागवडीत मेथी, पालक, सांबार,वांगी, चवळी ,गोबी, ब्रोकोली व फुले उत्पादन घेतात. यासाठी लागणारे पाणी ड्रिप इरिगेशनद्वारे ते आपल्या पिकांना देतात.त्यामुळे पाण्याचे सुद्धा योग्य नियोजन ते करत आहेत.

शेतीमध्ये आधुनिक साधनांचा वापर

शेतीची मशागत करण्यासाठी आधुनिक ट्रॅक्टर ,ट्रिलरचा वापर करतात. त्यामुळे वेळेची बचत होते.  मशागत करण्यासाठी आधुनिक ट्रॅक्टर ,ट्रिलर चा वापर करून शेतीवर होणारा मजुरांचा खर्च सुद्धा ते वाचवतात. फळबागेतील मधल्या जागेवर भाजीपाला पिके घेतात. साचून राहिलेल्या पाण्याजवळ जनावरांना लागणारा चारा लागवड केल्याने उन्हाळ्यात सुद्धा जनावरांना चारा उपलब्ध होतो. त्यामुळे डोंगरकर यांनी आपल्या शेतीचे इंचाइंचा प्रमाणे उत्कृष्ट नियोजन करून वर्षाकाठी लाखो रुपयांचा नफा कमी जागेत आपल्या शेतीमधून घेत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांसाठी डोंगरकर यांची शेती उत्कृष्ट नियोजनचे उत्तम उदाहरण ठरली आहे.

संबंधित बातम्या:

पालघरच्या आदिवासी भागातही आधुनिक शेती, 86 ठिकाणी 26 हजार स्ट्रॉबेरी झाडांची लागवड

पालघरच्या आदिवासी भागातही आधुनिक शेती, 11 एकरात 26 हजार स्ट्रॉबेरीची लागवड(Opens in a new browser tab)

(Chandrapur Pandurang Dongarkar success story of mix farming)