पालघरच्या आदिवासी भागातही आधुनिक शेती, 86 ठिकाणी 26 हजार स्ट्रॉबेरी झाडांची लागवड

सुरगाणा तालुक्यात शेतकऱ्यांना एकत्र करून स्ट्रॉबेरीच्या उत्पन्नाचा यशस्वी प्रयोग करणारे कृषी अधिकारी अनिल गावित यांनी पालघरमध्येही हा प्रयोग यशस्वी केलाय.

पालघरच्या आदिवासी भागातही आधुनिक शेती, 86 ठिकाणी 26 हजार स्ट्रॉबेरी झाडांची लागवड

पालघर : सुरगाणा तालुक्यात शेतकऱ्यांना एकत्र करून स्ट्रॉबेरीच्या उत्पन्नाचा यशस्वी प्रयोग करणारे कृषी अधिकारी अनिल गावित यांनी पालघरमध्येही हा प्रयोग यशस्वी केलाय. गावित यांनी पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि मोखाडा तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळवले आहे. मोखाडा तालुक्यात 42 ठिकाणी, तर जव्हार तालुक्यात 44 ठिकाणी 11 एकर क्षेत्रावर जवळपास 26 हजार स्ट्रॉबेरीच्या झाडांची प्रायोगिक तत्वावर लागवड केली आहे (Successful strawberry farming in tribal area Jawhar Mokhada Palghar).

पालघरमधील स्ट्रॉबेरी उत्पादनाचा हा प्रयोग यशस्वी झाला आहे. काही दिवसांमध्येच मुंबई, ठाणे आणि नाशिककरांना जव्हार-मोखाड्याची स्ट्रॉबेरी खायला मिळणार आहे. या लागवडीमुळे आदिवासी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अशी आधुनिक पिकांची शेती आपणही करू शकतो असा त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. या आधुनिक शेतीमुळे स्थलांतर थांबून आदिवासींचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे.

अतिदुर्गम आदिवासी भागात पारंपरिक शेतील आधुनिकतेची जोड

पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि मोखाडा तालुक्यात अतिदुर्गम आदिवासी भागातील शेतकरी पारंपरिक नाचणी, वरईची शेती करतात. या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही पिके घेतली जात नाही. रोजगार नसल्यामुळे येथे बेरोजगारी वाढली आहे. उपजीविकेसाठी मोठ्या प्रमाणात आदिवासी कुटुंबं शहराकडे स्थलांतर करत आहेत. त्यामुळे काही वर्षांपासून हे तालुके नेहमीच कुपोषण, बालमृत्यूमुळे चर्चेत आले आहेत. मात्र, आता आदिवासी शेतकरी स्वतः आधुनिक शेतीकडे वळले आहेत. त्यांनी यावेळी चक्क स्ट्रॉबेरीच्या झाडांची लागवड करून आपला आर्थिक स्तर उंचावला आहे. त्यांना या तालुक्यातील कृषी अधिकारी अनिल गावित आणि मंडळ कृषी अधिकारी ऋतुजा कोडलिंगे यांनी मोलाची साथ दिली.

सरकारी अधिकाऱ्यांच्या कृतीशीलतेतून आदिवासी सक्षम

कृषी अधिकारी अनिल गावित यांनी सुरगाणा तालुक्यात मंडळ कृषी अधिकारी असताना त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना एकत्र करून स्ट्रॉबेरीची लागवड यशस्वी प्रयोग केला होता. आता पालघर जिल्ह्यात जव्हार येथे कृषी अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी जव्हार आणि मोखाडाचं भौगोलिक महत्त्व ओळखलं. हे उंच ठिकाण असून जव्हारला मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे दुर्गम आदिवासी भागात स्ट्रॉबेरीच्या झाडांची लागवड होऊ शकते हे त्यांनी हेरलं. यानंतर त्यांनी आदिवासी  शेतकऱ्यांना एकत्र करून सापुतारा येथे सहल नेत आदिवासींना स्ट्रॉबेरीच्या झाडांची लागवड करण्याचे प्रशिक्षण दिले.

यानंतर आता मोखाडा तालुक्यात 42 ठिकाणी, तर जव्हार तालुक्यात 44 ठिकाणी 26 हजार स्ट्रॉबेरीच्या झाडांची प्रायोगिक तत्वावर लागवड केली आहे. हा प्रयोग यशस्वी झाला असून काही दिवसात मुंबई, ठाणे आणि नाशिककरांना जव्हार आणि मोखाड्याची स्ट्रॉबेरी घायला मिळणार आहे. या लागवडीमुळे आदिवासींमध्ये आनंदाचे वातावरण असून त्याचे स्थलांतर थांबून आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा :

महाराष्ट्रात फक्त महाबळेश्वरच नाही, आता पुण्यातही स्ट्रॉबेरीचं उत्पादन, युवा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

लॉकडाऊनचा फटका, लाखमोलाची स्ट्रॉबेरी जनावरांना, महाबळेश्वरमधील शेतकरी हवालदिल

Successful strawberry farming in tribal area Jawhar Mokhada Palghar

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI