अचानक थंडी कमी आणि वातावरणात बदल कसा झाला? हिवाळ्यात हलकासा पाऊस पडण्यामागील कारण काय ?

| Updated on: Dec 05, 2022 | 9:46 AM

थंडीचा महिना सुरू असतांना अचानक झालेला हा बदल शेतकरी वर्गाची चिंता वाढविणारा आहे. त्यातच मुसळधार पाऊस सांगितल्याने पुन्हा संकट ओढवण्याची शक्यता असल्याने आर्थिक मोठा बसू शकतो.

अचानक थंडी कमी आणि वातावरणात बदल कसा झाला? हिवाळ्यात हलकासा पाऊस पडण्यामागील कारण काय ?
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : गेल्या काही वर्षांपासून वातावरणात अनपेक्षित बदल होत असल्याचे बघायला मिळत आहे. यंदाच्या वर्षी तर कडक्याचा उन्हाळा, लांबलेला पावसाळा, आणि हाड गोठवणारी थंडी देखील अनुभवयाला मिळत आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांत राज्यातील हवामानात मोठा बदल झाला आहे. सध्या संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस झाल्याचे बघायला मिळाले आहे. त्यामुळे कडाक्याची पडलेली थंडी अचानक कमी होऊ पाऊस झाल्याने वातावरणात मोठा बदल झाल्याचे जाणवू लागले आहे. थंडीही कमी झाली आहे. मात्र, अचानक झालेला हा बदल नेमका कशामुळे झाला असा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हे ढगाळ वातावरण असून दक्षिणेकडील राज्यांत आगामी तीन ते चार दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील वातावरणात झालेल्या बदलामुळे शेतीकरी वर्ग धास्तावला आहे, विशेषतः द्राक्ष उत्पादक शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने दक्षिणेकंदील राज्यांना धोका आहे, सध्या ढगाळ वातावरण निर्माण झाले असून मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तवली आहे.

हे सुद्धा वाचा

थंडीचा महिना सुरू असतांना अचानक झालेला हा बदल शेतकरीवर्गाची चिंता वाढविणारा आहे. त्यातच मुसळधार पाऊस सांगितल्याने पुन्हा संकट ओढवण्याची शक्यता असल्याने आर्थिक मोठा बसू शकतो.

याशिवाय राज्यातील थंडीचा पारा हा डिसेंबर 9 पासून पुन्हा घसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे वातावरणातील हा लपंडाव अनेकांची चिंता वाढवणारा आहे.