Solapur : डॉक्टरांची अशी ही शेतीची ‘सेवा’, 10 गुंठ्यामध्ये आर्किड फुलशेती

| Updated on: May 13, 2022 | 5:01 PM

शेती व्यावसायाला कमर्शियल अॅंगल दिला तर काय होऊ शकते हे डॉ. पंकज दोशी यांनी दाखवून दिले आहे. गेल्या तीन वर्षापासुन दरमहा ही फुले हैद्राबाद, दिल्ली, मुंबई, पुण्याच्या बाजारपेठेत जात आहेत.नवे तंत्रज्ञान, योग्य नियोजन आणि व्यवस्थापनाने शेतीत निश्चित फायदा होऊ शकतो हे डॉ. दोशी यांनी दाखवुन दिलंय.आर्किड फुलांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे.

Solapur : डॉक्टरांची अशी ही शेतीची सेवा, 10 गुंठ्यामध्ये आर्किड फुलशेती
माढ्यातील डॉ. दोशी यांनी 10 गुंठ्यामध्ये आर्किड फूलशेती फुलवली आहे.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

संदीप शिंदे : माढा : आवड असली की सवड ही मिळतेच. पण त्यासाठी मनातून आवड असणे गरजेचे आहे. रुग्णसेवा आणि (Farming) शेती व्यवसाय याचा दूरपर्यंत काडीमात्र संबंध नाही. पण माढ्याच्या (Patient Care) रुग्णसेवा करीत काळ्या मातीची नाळ कधी तुटू दिली नाही.काळ्या आईची सेवा करीत डॉ. पंकज दोशी यांनी 10 गुंठ्यामध्ये (Orchid floriculture) आर्किड फुलशेतीचा प्रयोग केला आहे. अत्याधुनिक पध्दतीने त्यांनी हा प्रयोग केला असून केवळ सोलापूरच नव्हे तर बीड,लातुर,उस्मानाबाद पहिलाच प्रयोग असल्याचे सांगितले जात आहे. देशातील मुख्य बाजारपेठेत या आर्किड फुलांना मागणी आहे. वैद्यकीय सेवा बजावत असताना त्यांनी आपला छंदा जोपासला आहे तर यातून लाखोंची कमाई करण्याची संधी त्यांनी निर्माण केली आहे.

योग्य नियोजन अन् व्यवस्थापन

शेती व्यावसायाला कमर्शियल अॅंगल दिला तर काय होऊ शकते हे डॉ. पंकज दोशी यांनी दाखवून दिले आहे. गेल्या तीन वर्षापासुन दरमहा ही फुले हैद्राबाद, दिल्ली, मुंबई, पुण्याच्या बाजारपेठेत जात आहेत.नवे तंत्रज्ञान, योग्य नियोजन आणि व्यवस्थापनाने शेतीत निश्चित फायदा होऊ शकतो हे डॉ. दोशी यांनी दाखवुन दिलंय.आर्किड फुलांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. मंदिर सजावट, लग्नासह विविध समारंभात याबरोबरच बुके निर्मितीसाठी या फुलाचा वापर केला जातो. त्यामुळे शहरी भागात या फुलांना चांगली मागणी आहे.परिणामी या फुलांना चांगला दर मिळतोय.

अशी झाली सुरवात

डॉ. दोशी यांना मुळात शेती व्यवसायाचा छंद आहे. काही वर्षापूर्वी त्यांनी इस्लामपुरातील डॉ.विकास खोत व डॉ. विक्रांत खोत यांची फुलशेती पाहिली आणि दोशी यांनी आर्किड फुलशेती पाहुन गावी शेती फुलवण्याचा निर्धार केला.माढ्याच्या शिवारात असलेल्या शेतात त्यांनी पॉलिहाऊस उभारून फुलशेतीला सुरुवात केली. याकरिता पुण्यातील रोपवाटिकेतून रोपे आणली. 10 हजारांहून अधिक रोपांची लागवड यामध्ये करण्यात आली आहे. जांभळा, पांढऱ्या रंगाच्या फुलांना अधिक मागणी असुन परदेशातील व्यापाऱ्याकडून देखील मागणी होत असुन माढ्यात बहरलेली फुले परदेशात भाव खाताना दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

आर्किड फुलांची निर्यातही

केवळ देशभरातील मुख्य बाजारपेठेतच नव्हे तर परदेशातील व्यापाऱ्यांकडून देखील या फुलांना मागणी आहे. डॉ. दोशी यांनी शेती व्यवसायात असा काय प्रयोग केला आहे त्याची प्रेरणा आता या भागातील हजारो शेतकऱ्यांना मिळणार आहे. जांभळा,पांढऱ्या रंगाच्या फुलांना अधिक मागणी असुन परदेशातील व्यापाऱ्याकडून देखील मागणी होत असुन माढ्यात बहरलेली फुले परदेशात भाव खाताना दिसत आहेत. फूलशेती फुलवण्यासाठी त्यांना त्यांच्या पत्नी डॉ. सुतेजा दोशी यांचे देखील सहकार्य लाभले आहे.