Kharif Season : सर्वकाही अनुकूल मात्र, खरिपाच्या तोंडावर राज्य कृषिमंत्र्याचे शेतकऱ्यांना काय आवाहन?

| Updated on: May 19, 2022 | 9:54 PM

उत्पादनात वाढ व्हावी या उद्देशाने दरवर्षी खरिपापूर्वी मशागतीची कामे केली जातात. काळाच्या ओघात ही कामे यांत्रिकिकरणाच्या माध्यमातून केली जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त आहे. उन्हाळी पिकानंतर आता खरिपासाठी पोषक वातावरण आणि शेतकऱ्यांसह कृषी विभाग सज्ज झाला असून बियाणांची तर कमी नाहीच पण रासायनिक खतेही मागणीनुसार पुरवली जाणार असल्याचे कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले आहे.

Kharif Season : सर्वकाही अनुकूल मात्र, खरिपाच्या तोंडावर राज्य कृषिमंत्र्याचे शेतकऱ्यांना काय आवाहन?
राज्य कृषिमंत्री दादा भुसे
Follow us on

मुंबई : गतवर्षी अधिकच्या पावसामुळे (Kharif Season) खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असले तरी यंदा खरीपपूर्व (Environment friendly) वातावरण अनुकूल आहे. शिवाय हवामान विभागाने यंदा वेळेत (Monsoon) पावसाचे आगमन होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सर्वकाही सुरळीत असताना राज्य कृषिमंत्री दादा भुसे यांनी ऐन खरिपाच्या तोंडावर राज्यातील शेतकऱ्यांना कानमंत्र दिला आहे. उत्पदनात वाढ आणि दुबार पेरणीचे संकट टाळायचे असेल तर शेतकऱ्यांनी पुरेसा म्हणजेच 100 मिमी पेक्षा अधिक पाऊस झाल्यावरच चाढ्यावर मूठ ठेवण्याचा सल्ला दिला आहे. राज्याची खरीप हंगामपूर्व बैठक झाल्यानंतर त्यांनी हे विधान केले आहे. शिवाय राज्यात सोयाबीन आणि कापसाचेच क्षेत्र यंदा वाढणार हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पोषक वातावरणाचा फायदा घेण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

खरीपपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात

उत्पादनात वाढ व्हावी या उद्देशाने दरवर्षी खरिपापूर्वी मशागतीची कामे केली जातात. काळाच्या ओघात ही कामे यांत्रिकिकरणाच्या माध्यमातून केली जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त आहे. उन्हाळी पिकानंतर आता खरिपासाठी पोषक वातावरण आणि शेतकऱ्यांसह कृषी विभाग सज्ज झाला असून बियाणांची तर कमी नाहीच पण रासायनिक खतेही मागणीनुसार पुरवली जाणार असल्याचे कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले आहे.

जिल्हा पीकनिहाय आढावा

केवळ खरीप हंगामाचाच नव्हे तर त्या-त्या जिल्ह्यातील पीकनिहाय कृषी विभागाकडून आढावा घेण्यात आला आहे. त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांना बियाणे आणि रासायनिक खते याचा देखील वापर कसा करावा याची माहिती मिळाली आहे. मराठवाड्यात सोयाबीनचा पेरा अधिक असतो. त्यानुसारच माहिती घेऊन या पिकाबद्दल माहिती देण्यात आली आहे. याचा फायद उत्पादनासाठी होईल असा विश्वास भुसे यांनी व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा

म्हणून पुरेसा पाऊसच आवश्यक

यंदा हवामान विभागाने तर सर्वकाही पोषक राहिल असा अंदाज वर्तवला आहे आणि तो खराही होताना पाहवयास मिळत आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ कऱण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरवातीपासूनच नियोजन करणे गरजेचे आहे. पुरेसा पाऊस न होता पेरणी केली तर पुन्हा दुबार पेरणीचे संकट ओढावते शिवाय त्यामध्ये खर्चही अधिक होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाचा सल्ला घेऊनच श्रीगणेशा करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.