Puntamba : शेतकऱ्यांच्या ‘या’ प्रश्नांभोवती फिरतेय पुणतांब्याच्या आंदोलनाची दिशा, यंदाही राज्यव्यापी आंदोलन!

Puntamba : शेतकऱ्यांच्या 'या' प्रश्नांभोवती फिरतेय पुणतांब्याच्या आंदोलनाची दिशा, यंदाही राज्यव्यापी आंदोलन!
आंदोलनाची दिशा कोणत्या मुद्द्यावर असणार याबाबत शेतकऱ्यांचे काय म्हणणे आहे?

सध्या शेतकऱ्यांसमोर ज्या अडचणी उभ्या आहेत त्यावरच आंदोलनाची दिशा ठरणार आहे. राज्यात सध्या अतिरिक्त उसाचा प्रश्न बिकट झाला आहे. 19 महिने झाले तरी ऊस हा फडातच आहे.त्यामुळे ऊस जर शिल्लक राहिला तर एकरी 2 लाख रुपये अनुदान शिवाय कांद्याची निर्यातची धोरण अवलंबल्यानेच कांद्याचे दर घटले आहेत. निर्यातीला परवानगी दिली तरच कांद्याचे दर वाढतील अशी शेतकऱ्यांची भावना आहे.

मनोज गाडेकर

| Edited By: राजेंद्र खराडे

May 19, 2022 | 4:21 PM

अहमदनगर : 2017 साली नगर जिल्ह्यातील (Puntamba) पुणतांबा येथे जे शेतकरी आंदोलन उभारले गेले ते राज्यव्यापी झाले होते. शेतकरी उत्स्फुर्त या आंदोलनात सहभगी झाले होते. त्याामुळे (State Government) राज्य सरकारलाच नव्हे तर केंद्रालाही याची दखल घ्यावी लागली होती. आता पुन्हा (Farmer Problem) शेतकऱ्यांच्या विविध समस्या घेऊन आंदोलन उभारले जाणार आहे. त्या अनुशंगाने 23 मे रोजी पुणतांबा येथे पुन्हा ग्राम सभा पार पडली जाणार असून याच सभेत आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. सध्याचे राजकारण, आरोप-प्रत्यारोप यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे ना विरोधी पक्षाला घेणे आहे ना सत्ताधाऱ्यांना. त्यामुळे पुणतांब्याने जर पुन्हा राज्यव्यापी आंदोलन उभारले तर त्याचा नक्कीच परिणाम होणार आहे.

गुरुवारी बैठक 23 मे ठरणार दिशा

राज्यव्यापी आंदोलनाची दिशा ठरवण्याच्या दृष्टीने पुणतांबा येथे गुरुवारी ग्रामस्थांची बैठक पार पडली. या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले होते शिवाय काय निर्णय होणार हे देखील महत्वाचे होते. पण गुरुवारी केवळ ग्रामस्थांची बैठक पार पडली असून आंदोलनाची पुढची दिशा ही 23 मे रोजी ठरणार आहे. मात्र, कोणत्या मुद्द्यावर शेतकरी आवाज उठवणार याचा सूर आजच्या बैठकीत लागला आहे. सध्या शेतीमालाच्या दरापासून अतिरिक्त उसाचे प्रश्न या बैठकीत मांडले जाणार आहेत.

हे आहेच चर्चेतले मुद्दे

सध्या शेतकऱ्यांसमोर ज्या अडचणी उभ्या आहेत त्यावरच आंदोलनाची दिशा ठरणार आहे. राज्यात सध्या अतिरिक्त उसाचा प्रश्न बिकट झाला आहे. 19 महिने झाले तरी ऊस हा फडातच आहे.त्यामुळे ऊस जर शिल्लक राहिला तर एकरी 2 लाख रुपये अनुदान शिवाय कांद्याची निर्यातची धोरण अवलंबल्यानेच कांद्याचे दर घटले आहेत. निर्यातीला परवानगी दिली तरच कांद्याचे दर वाढतील अशी शेतकऱ्यांची भावना आहे. गव्हाच्या दरातही घट झाली आहे. जर निर्यात कायम राहिली असती तर यंदा विक्रमी दर मिळाले असते. एकतर निसर्गाचा लहरीपणा आणि दुसरीकडे सरकारची धोरणे यामुळे मुख्य मुद्दे घेऊन आंदोलन उभारले जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

शेतकरी पुन्हा संपावर का?

शेतक-यांच्या प्रश्नी ऐतिहासिक अशा शेतकरी संपाची मशाल पेटवणा-या पुणतांबा गावात पुन्हा एकदा आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी ग्रामपंचायत समोर किसान क्रांतीचे पदाधिकारी , शेतकरी नेते , विविध पक्षाचे पदाधिकारी तसेच शेतकरी यांची बैठक पार पडलीय…सोमवार २३ मे रोजी पुणतांबा गावात ग्रामसभेत शेतकरी आंदोलनाबाबत पुढची दिशा ठरणार आहे. शेतकरी पुन्हा एकदा संपावर जाणार का ? की राज्यव्यापी आंदोलन करणार याबाबत ग्रामसभेत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें