AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026: भारत पाकिस्तान यांच्यात एक नाही तर दोन सामने होणार, कसं काय ते समजून घ्या

IND vs PAK, T20 World Cup 2026: भारताविरुद्ध सामना खेळणार नाही असा पवित्रा घेणाऱ्या पाकिस्तानने आता पलटी मारली आहे. भारताविरुद्ध सामना खेळण्याची तयारी भिकारड्या पाकिस्तानने दाखवली आहे. असं होणार हे जगजाहीर होतं. त्यामुळे पाकिस्तानच्या धमक्या पुन्हा फुसक्या निघाल्या.

T20 World Cup 2026: भारत पाकिस्तान यांच्यात एक नाही तर दोन सामने होणार, कसं काय ते समजून घ्या
भारत पाकिस्तान यांच्यात एक नाही तर दोन सामने होणार, कसं काय ते समजून घ्याImage Credit source: Asian Cricket Council
| Updated on: Feb 10, 2026 | 3:46 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना 15 फेब्रुवारीला नियोजित वेळेनुसार होणार आहे. त्यामुळे आतापर्यंत सुरू असलेली सर्व नाटकं बंद झाली आहेत. पीसीबी आणि पाकिस्तान सरकारच्या बैठकीनंतर हा सामना खेळण्यास हिरवा कंदील देण्यात आला आहे. त्यामुळे बांगलादेशवर अन्याय झाल्याचं कारण पुढे जे काही नाटकं सुरू होती त्यावर आता पडदा पडला आहे. खरं तर पाकिस्तानने कितीही आदळआपट केली असती तरी हा सामना खेळले असते हे जगजाहीर होते. पण नाटकं करून होती नव्हती ती लाज घालवून आता सामना खेळण्याची तयारी केली आहे. पण या स्पर्धेत एकच सामना नाही तर भारत पाकिस्तान यांच्यात दोन सामने खेळले जाण्याची शक्यता आहे. जर समीकरण जुळून आलं तर ते शक्य आहे. पण कसं ते समजून घ्या.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत एकूण 20 संघ असून चार गटात विभागणी केली आहे. प्रत्येक गटात 5-5 संघ आहेत. साखळी फेरीत प्रत्येक गटातील संघ एकदा एकमेकांचा सामना करणार हे निश्चित आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असल्याने साखळी फेरीत भिडणार हे नक्की आहे. 15 फेब्रुवारीला कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. पण या स्पर्धेत दुसऱ्यांदा भिडण्याची शक्यता आहे. कारण साखळी फेरीनंतर सुपर 8 फेरीचे सामने होती. सुपर 8 फेरीसाठी दोन गट असताल प्रत्येक गटातील संघाची क्रमवारीच्या आधारावर विभागणी केली जाईल.

भारत पाकिस्तान एकाच गटात असल्याने सुपर 8 फेरीसाठी विभागणी झाली तर वेगवेगळ्या गटात पडणार आहेत. त्यामुळे सुपर 8 फेरीत आमनासामना होणार नाही. पण भारत पाकिस्तानने सुपर 8 फेरीत चांगली कामगिरी केली तर उपांत्य फेरीत भिडण्याची शक्यता आहे. सुपर 8 च्या गट 1 मध्ये भारताने टॉपचं स्थान मिळवलं आणि ग्रुप 2 मध्ये पाकिस्तानचा संघ दुसऱ्या स्थानावर राहिला. तर दोन्ही संघ उपांत्य फेरीत भिडतील. पण तसं गणित जुळलं नाही आणि दोन्ही संघांनी अंतिम फेरी गाठली तर 2007 नंतर अंतिम फेरीत भारत पाकिस्तान सामना पाहायला मिळेल.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात