Hapus Mango : फळांच्या राजाची जपानमध्येही दमदार ‘एंट्री’, केशरच्या मागणीतही वाढ

फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याचे सर्वाधिक उत्पादन हे महाराष्ट्रात आणि त्यापाठोपाठ गुजरातमधील जुनागढ येथे आहे. सर्वाधिक महागड्या आणि चवीला गोड असणाऱ्या हापूसचे व्यसन आता अमेरिकापाठोपाठ आता जपानमधील नागरिकांनाही लागले आहे. अॅग्रीकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रॉडक्टस् एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट अॅथॉरिटीने (अपेडा) मुंबईहून अल्फान्सो आणि केशर आंब्याची जपानला निर्यात केली जात आहे.

Hapus Mango : फळांच्या राजाची जपानमध्येही दमदार एंट्री, केशरच्या मागणीतही वाढ
हापूस आंब्याची आवक घटली आहे.
| Edited By: | Updated on: Mar 30, 2022 | 5:30 AM

मुंबई : फळांचा राजा असलेल्या (Hapus Mango) हापूस आंब्याचे सर्वाधिक उत्पादन हे महाराष्ट्रात आणि त्यापाठोपाठ गुजरातमधील जुनागढ येथे आहे. सर्वाधिक महागड्या आणि चवीला गोड असणाऱ्या हापूसचे व्यसन आता अमेरिकापाठोपाठ आता (Japan) जपानमधील नागरिकांनाही लागले आहे. अॅग्रीकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रॉडक्टस् एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट अॅथॉरिटीने (अपेडा) मुंबईहून अल्फान्सो आणि केशर आंब्याची जपानला निर्यात केली जात आहे. हंगामातील (Mango Export) निर्यातीची पहिली खेप नुकतीच पोहचली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त टोकियो येथे एक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील विविध स्टॉलमध्ये आंब्याचे प्रदर्शन केले जाणार आहे. दरवर्षी देशातून 400 कोटी रुपयांचा आंबा निर्यात केला जातो. यामध्ये जपानचे योगदान खूपच कमी आहे. देशातून आंब्याची सर्वाधिक निर्यात ही संयुक्त अरब अमिरातीमध्ये होते. याशिवाय इंग्लंड, अमेरिका, सौदी अरेबिया, हाँगकाँग, इटली आणि स्वित्झर्लंड इत्यादी देशांतही आंब्याची निर्यात केली जाते. येथून दशहरी, चौसा, लमे, अल्फान्सो या आंब्यांना भरपूर मागणी आहे.

अपेडा कसा काम करतो?

देशातून शेतीमालाची निर्यात केली जावे यासाठी अपेडा अर्थात अॅग्रीकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रॉडक्टस् एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट अॅथॉरिटी ही काम करीत आहे. यासाठी व्हर्च्युअल ट्रेड फेअर आयोजित करण्यासाठी व्हर्च्युअल पोर्टल विकसित करणे, शेतकरी कनेक्ट पोर्टल, ई-ऑफिसेस, क्षैतिज ट्रेसॅबिलिटी सिस्टम, खरेदीदार-विक्रेता भेट, रिव्हर्स खरेदीदार-विक्रेता भेट, उत्पादन विशिष्ट मोहिम या माध्यमातून निर्यात प्रोत्साहन उपक्रम राबवले जातात. एवढेच नाही तर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आणि राज्यातून शेतीमालाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी अपेडा राज्य सरकारबरोबर काम करीत आहे. भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील एक वैधानिक संस्था, अपेडा ही भारतीय कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न निर्यातीला चालना देणारी नोडल एजन्सी आहे. बागायती, फुलशेती, प्रक्रिया केलेले अन्न, कुक्कुटपालन उत्पादने, दुग्धशाळा आणि बरेच काही निर्यात सोपी करण्यासाठी ही काम करीत आहे.

हापूसला आणि केशरला भौगोलिक मानांकन

महाराष्ट्र राज्यात हापूसचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तर केसर महाराष्ट्रात आणि जुनागड गुजरातमध्ये अधिकचे उत्पादन होते. हापूस आंबा हा कोकण विभागाच्या अर्थकारणाचा मुख्य आधार आहे. रत्नागिरी, आणि रायगड येथेही याचे उत्पादन घेतले जाते. कर्नाटक आणि गुजरातमध्येही याचे पीक घेतले जाते. परंतु, सर्वात मोठे आंबा निर्यातदार राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे. हापूस हा किलोऐवजी डझनभरात विकला जातो. यंदाच्या हंगामात दीड ते दोन हजार रुपये डझनचा भाव आहे. हापूस हा त्याच्या विशिष्ट चवीसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील हापूस आणि केसर आंब्याचा भौगोलिक मानांकन मिळालेले आहे.

संबंधित बातम्या :

Lasalgoan : शेतकऱ्यांकडूनच कांदा मार्केट बंद, बाजार समिती प्रशासनही हतबल, नेमके कारण काय ?

Central Government: पेरणीपासून ते बाजारपेठेपर्यंत सर्व सुविधा एकाच ठिकाणी, केंद्र सरकारचा काय आहे Mega plan?

Latur Market : सोयाबीन दराचा पुन्हा चढता आलेख, शेतकऱ्यांसमोरील समस्या मात्र कायम..!