Lasalgoan : शेतकऱ्यांकडूनच कांदा मार्केट बंद, बाजार समिती प्रशासनही हतबल, नेमके कारण काय ?

Lasalgoan : शेतकऱ्यांकडूनच कांदा मार्केट बंद, बाजार समिती प्रशासनही हतबल, नेमके कारण काय ?
लासलगाव मार्केटमधून शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरीला गेल्या नंतर शेतकऱ्यांनी काही काळ मार्केट बंद केले होते.
Image Credit source: TV9 Marathi

एकीकडे कांद्याचे दर दिवसाला कमी होत आहेत. अशा परस्थितीमध्ये मार्केटला आलेल्या कांद्याची केव्हा विक्री होतेय हा एकच प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतो. अशा परस्थितीमध्ये शेतकऱ्यांकडूनच कांदा मार्केट बंद. हे अवास्तव वाटत असले तरी शेतकऱ्यांवर परस्थितीच तशी ओढावली होती. कांदा विक्रीसाठी कांदा भरुन आणलेला ट्रक्टरच अज्ञातांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे कांदा असलेली ट्ऱॉली जागेवर सोडली असून केवळ हेडच चोरट्यांनी पळवून नेले आहे.

उमेश पारीक

| Edited By: राजेंद्र खराडे

Mar 29, 2022 | 4:41 PM

लासलगाव : एकीकडे (Onion Rate) कांद्याचे दर दिवसाला कमी होत आहेत. अशा परस्थितीमध्ये मार्केटला आलेल्या कांद्याची केव्हा विक्री होतेय हा एकच प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतो. अशा परस्थितीमध्ये शेतकऱ्यांकडूनच (Onion Market) कांदा मार्केट बंद. हे अवास्तव वाटत असले तरी शेतकऱ्यांवर परस्थितीच तशी ओढावली होती. कांदा विक्रीसाठी कांदा भरुन आणलेला (Tractor theft) ट्रॅक्टरच अज्ञातांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे कांदा असलेली ट्रॉली जागेवर सोडली असून केवळ हेडच चोरट्यांनी पळवून नेले आहे. बाजार समिती आवारातील जबाबदारी ही येथील प्रशासनाची आहे. शिवाय बाजार समिती आवारातील सीसीटीव्ही ही बंद आणि अस्पष्ट असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाबद्दल मंगळवारी सकाळी काही काळ कांदा मार्केटच बंद केले. अखेर प्रशासनाने मदतीचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी माघार घेतली आहे.

नेमके प्रकरण काय?

लासलगाव बाजार समितीत दररोज दीड ते दोन हजार ट्रॅक्टर, पिकअप वाहनातून कांदा विक्रीला येत असतो.निफाड तालुक्यातील लासलगाव जवळ असलेल्या टाकळी विंचूर येथील कांदा उत्पादक शेतकरी सुरेश बाबाजी काळे यांनी सोमवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान कांद्याने भरलेला ट्रॅक्टर टारली लिलावासाठी आणला होता. जेवणासाठी घरी गेले असता त्याच दरम्यान अज्ञात चोरट्याने कांद्याने भरलेली ट्ऱॉली सोडून ट्रॅक्टर चोरून नेल्याची घटना सोमवारी रात्री साडे दहाच्या दरम्यान घडली. याबाबत बाजार समिती जवळ पाठपुरावा केला असता बाजार समितीत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे बंद तर अस्पष्ट होते. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाच्या कारभारावर बोट ठेवत संबंधित शेतकऱ्यास मदत देण्याची भूमिका इतर शेतकऱ्यांनी घेतली होती.

मुख्य प्रवेशद्वरावरच शेतकऱ्यांचा ठिय्या

प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळेच शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरीला गेला. एकीकडे निसर्गाचा लहरीपणा यामध्येच कांद्याला कवडीमोल दर आणि यातच शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळच ठिय्या दिला होता. त्यामुळे काही काळ व्यवहार ठप्प होते. मात्र, शेतकऱ्याचे झालेले नुकसान पाहता शेतकरी काळे यांना मदत केली जाणार असल्याचे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते. या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी माघार घेतली व व्यवहार हे सुरळीत झाले होते.

आंदोलनाला शिवसेनेचाही पाठिंबा

राज्यातील शेतकरी हे अडचणीत आहेत. निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर झाला आहे. यातच अशाप्रकारचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याने सावरायचे कसे हा प्रश्न आहे. बाजार समिती परिसरातीलच वाहनांची ही अवस्था म्हणल्यावर शेतकऱ्यांच्या मालाचे काय असा सवाल उपस्थित करीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.

संबंधित बातम्या :

Central Government: पेरणीपासून ते बाजारपेठेपर्यंत सर्व सुविधा एकाच ठिकाणी, केंद्र सरकारचा काय आहे Mega plan?

Latur Market : सोयाबीन दराचा पुन्हा चढता आलेख, शेतकऱ्यांसमोरील समस्या मात्र कायम..!

Soybean : पावसाळी पिकाला उन्हाच्या झळा, फुलअवस्थेत असलेल्या सोयाबीनवर परिणाम काय?

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें