AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक

आज ‘या’ मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक

राखी राजपूत
राखी राजपूत | Updated on: Mar 08, 2026 | 10:30 AM
Share

मुंबईतील मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर आज रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द होतील किंवा धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, असे रेल्वे प्रशासनाने आवाहन केले आहे. ब्लॉकच्या वेळेत काही मार्गांवर पर्यायी सेवा उपलब्ध असतील.

रेल्वे प्रशासनाकडून आज रविवारी मुंबईतील तिन्ही प्रमुख रेल्वे मार्गांवर म्हणजेच मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. या विशेष ब्लॉकमुळे रेल्वे सेवांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.३० वाजल्यापासून दुपारी ३.४५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत ब्लॉक राहणार आहे. तसेच, सीएसटी, पनवेल, बेलापूर आणि वाशी दरम्यान सकाळी १०.१७ ते दुपारी ३.४७ पर्यंत हार्बर मार्गावरील काही सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

या ब्लॉकच्या काळात मुख्य मार्गावरील सर्व जलद फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार असून, हार्बर मार्गावरील काही फेऱ्या रद्द करण्यात येतील. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी, कुर्ला, पनवेल, वाशी दरम्यान लोकल चालवण्यात येणार आहेत. तसेच, हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ठाणे, वाशी, नेरूळ मार्गे प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना वेळापत्रक पाहूनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

Published on: Mar 08, 2026 10:30 AM

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या