आजोबा पेक्षा नातू श्रीमंत! प्रतिज्ञापत्रात पार्थ पवारांची संपत्ती किती?
महाराष्ट्र राज्यसभा निवडणुकीत शरद पवार आणि पार्थ पवार बिनविरोध खासदार झाले आहेत. प्रतिज्ञापत्रानुसार, पार्थ पवार (८८.३३ कोटी) हे आजोबा शरद पवारांपेक्षा (६०.७१ कोटी) अधिक श्रीमंत आहेत. रोख रक्कम, स्थावर मालमत्ता आणि गुंतवणुकीसह विविध प्रकारच्या मालमत्तांचा तपशील यातून समोर आला आहे.
महाराष्ट्र राज्यातील राज्यसभा निवडणुकीत शरद पवार आणि त्यांचे नातू पार्थ पवार बिनविरोध खासदार म्हणून निवडून आले आहेत. या निमित्ताने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या मालमत्तेचा तपशील समोर आला आहे. विशेष म्हणजे, शरद पवारांपेक्षा पार्थ पवार हे अधिक श्रीमंत असल्याचे या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झाले आहे.
शरद पवारांची एकूण संपत्ती ६० कोटी ७१ लाख रुपये असून, पार्थ पवारांची संपत्ती ८८ कोटी ३३ लाख रुपये इतकी आहे. रोख रकमेच्या बाबतीत, शरद पवारांकडे १ लाख २५ हजार रुपये तर पार्थ पवारांकडे ५ लाख २० हजार रुपये आहेत. गुंतवणुकीमध्ये, शरद पवारांकडे समभाग आणि म्युच्युअल फंड्समध्ये २७ कोटी रुपये आहेत, तर पार्थ पवारांकडे १ कोटी १७ लाख रुपये आहेत. स्थावर मालमत्तेतही पार्थ पवार आघाडीवर आहेत, त्यांच्याकडे ७६ कोटी ९८ लाखांची मालमत्ता आहे, ज्यात बारामतीमधील शेतजमीन आणि पुण्यातील घराचा समावेश आहे. शरद पवारांकडे १५ कोटी ९९ लाखांची स्थावर मालमत्ता आहे.
Published on: Mar 08, 2026 09:46 AM
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
