AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP : नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मतदानाच्या काही तास आधी...कराळे मास्तर ढसाढसा रडले, नेमकं काय घडलं?

NCP : नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मतदानाच्या काही तास आधी…कराळे मास्तर ढसाढसा रडले, नेमकं काय घडलं?

| Updated on: Oct 23, 2026 | 11:26 AM
Share

पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीविरोधात बंडखोरी केल्याप्रकरणी नितेश कराळे मास्तरांची शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षातून काढल्यानंतर कराळे मास्तर ढसाढसा रडले. पक्षाविरोधी कारवाया आणि संभ्रम निर्माण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

पदवीधर निवडणुकीतील बंडखोरीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) नितेश कराळे मास्तरांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाच्या काही तासांआधीच ही कारवाई करण्यात आली, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीने काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांना पाठिंबा दिला होता. मात्र, नितेश कराळे मास्तरांनी पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाया आणि शरद पवारांचा पाठिंबा असल्याचा संभ्रम निर्माण केल्याचा ठपका ठेवण्यात आला.

हकालपट्टी झाल्यानंतर नितेश कराळे मास्तर अक्षरशः ढसाढसा रडले. त्यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले की, “मी पवार साहेबांचा सन्मान करतो, त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकलो. पण माझ्यावर केलेली कारवाई मला चुकीची वाटते.” तसेच “सहा जिल्ह्यांमध्ये मी एकटा उरून पुरून राहिलो म्हणून दबाव टाकून कारवाई करायची,” असेही त्यांनी म्हटले. या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे.

 

Published on: Oct 23, 2026 11:26 AM

Follow Us