Crop Insurance : यंदाचाच नव्हे गेल्या तीन वर्षापासूनच्या पीकविमा रकमेच्या प्रतिक्षेत आहेत ‘या’ मंडळातील शेतकरी

| Updated on: Jan 31, 2022 | 4:10 PM

खरीप हंगामातील पीकविमा मिळाला नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे, कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. मराठावाड्यात अधिकतर तक्रारी ह्या उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातून झालेल्या आहेत. या तक्रारी केवळ यंदाचा विमा मिळाला नसल्याबाबतच्या आहेत. मात्र, उस्मानाबाद जिल्ह्यात असे एक महसूल मंडळ आहे की, येथील शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षातील पीकविम्याची प्रतीक्षा आहे.

Crop Insurance : यंदाचाच नव्हे गेल्या तीन वर्षापासूनच्या पीकविमा रकमेच्या प्रतिक्षेत आहेत या मंडळातील शेतकरी
पीकविमा रकमेच्या मागणीसाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
Follow us on

उस्मानाबाद : खरीप हंगामातील पीकविमा मिळाला नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे, कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. मराठावाड्यात अधिकतर तक्रारी ह्या उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातून झालेल्या आहेत. या तक्रारी केवळ यंदाचा विमा मिळाला नसल्याबाबतच्या आहेत. मात्र, (Osmanabad) उस्मानाबाद जिल्ह्यात असे एक (Revenue Board) महसूल मंडळ आहे की, येथील शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षातील (Crop Insurance) पीकविम्याची प्रतीक्षा आहे. विमा रक्कम अदा करुनही दरवर्षी पदरी निराशाच हे ठरलेले आहे. पीकविमा रकमेच्या मागणीसाठी अनेकवेळा आंदोलने, मोर्चे करुनही दखल घेतली जात नसल्याने अखेर आता अन्नत्यागाशिवाय पर्यायच उरला नसल्याचे म्हणत मुरुम मंडळातील शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनास सुरवात केली आहे. त्यामुळे पोशिंद्यावरच ही वेळ आली असून आता तरी त्यांना न्याय मिळतो का नाही हे पहावे लागणार आहे.

विमा कंपनी बदलल्यापासून अडचण कायम

उमरगा तालुक्यातील मुरुम मंडळातील पीकांचा विमा हा ऑल इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे अदा केला जात होता तेव्हा शेतकऱ्यांना नियमित विमा रक्कम मिळत होती. मात्र, गेल्या चार वर्षापासून बजाज अलायन्स कंपनीकडे मंडळ वर्ग झाल्यापासून शेतकऱ्यांना विमा परतावाच मिळालेला नाही. यासंदर्भात केवळ आश्वासनेच देण्यात आली आहेत. यंदा विमा रक्कम वितरीत होऊन तीन महिन्याचा कालावधी लोटलेला आहे पण मंडळातील एकाही शेतकऱ्यास विमा मिळालेला नाही.

तीन वर्षापासून रखडला पीकविमा

उस्मानबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यासह अन्य भागात अनेक शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही, नुकसान झाल्याच्या 72 तासात तक्रार करूनही विमा दिला जात नाही , 2019 , 2020 व 2021 या 3 वर्षाचा विमा थकीत आहे , जो पर्यंत पिक विमा दिला जात नाही तोपर्यंत अन्न त्याग करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. गेल्या तीन वर्षापासून शेतकऱ्यांचा विमा रक्कम रखडलेली असताना यंदा पुन्हा तक्रारी नोंदवून शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडलेले नाही. याकडे प्रशासनासह लोकप्रतिनीधींचे दुर्लक्ष असल्याने आता शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरवात केली आहे.

काय आहे नियम?

पीक नुकसानीनंतर संबंधित शेतकऱ्यांनी केवळ 72 तासांच्या आतमध्ये झालेल्या नुकसानीची माहीती ही अॅपवरुन संबंधित विमा कंपनीला देणे गरजेचे आहे. त्यानंतर तीन दिवसांमध्ये विमा कंपनीचे प्रतिनीधी घटनास्थळी येऊन पंचनामा करुन शेतकरी नुकसानभरपाईसाठी पात्र आहे की नाही यासाठी पीक पंचनामे केले जातात. विमा कंपनीचा प्रतिनीधी आणि कृषी विभागाकडून पंचनाम्याचा अहवाल सादर होऊनही या मुरुम मंडळातील शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी आता अन्नत्याग आंदोलन करीत आहेत.

संबंधित बातम्या :

Agricultural prices : पणन मंडळाचा उपक्रम, आता घरबसल्याच शेतकऱ्यांना कळणार शेतीमालाचे दर

Kharif Season : हंगाम सुरु होताच तुरीची विक्रमी आवक, मोजमापसाठी दोन दिवसाचा कालावधी..!

Grape : द्राक्षाचे नुकसान आता बेदाणा निर्मितीच्याही वाढल्या अडचणी, काय आहेत समस्या ?