Damage to vineyards : बुडत्याला काडीचा आधार, फळबागांचे नुकसान लाखोंत अन् भरपाई हजारो रुपयांमध्ये

| Updated on: Dec 30, 2021 | 4:30 PM

नुकसानीची तीव्रता पाहता लागलीच पंचनामे करण्याचे आदेश राज्य कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले होते. वेळप्रसंगी कागदावर नोंदी घ्या पण पंचनाम्यास विलंब होता कामा नये अशा सुचनाच त्यांनी दिल्या होत्या. त्यांच्या या तत्परतेमुळे इंदापूर तालुक्यातील द्राक्ष बागायत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली असली तरी नुकसानीच्या तुलनेत तोडकी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.

Damage to vineyards : बुडत्याला काडीचा आधार, फळबागांचे नुकसान लाखोंत अन् भरपाई हजारो रुपयांमध्ये
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

इंदापूर : महिनाभरापूर्वी झालेल्या (Untimely Rain) अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान हे द्राक्ष बागांचे नुकसान झाले होते. नुकसानीची तीव्रता पाहता लागलीच पंचनामे करण्याचे आदेश राज्य कृषिमंत्री (Dadaji Bhuse) दादा भुसे यांनी दिले होते. वेळप्रसंगी कागदावर नोंदी घ्या पण पंचनाम्यास विलंब होता कामा नये अशा सुचनाच त्यांनी दिल्या होत्या. त्यांच्या या तत्परतेमुळे इंदापूर तालुक्यातील ( Assistance to grape growers) द्राक्ष बागायत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली असली तरी नुकसानीच्या तुलनेत तोडकी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. बाग जोपासण्या हेक्टरी लाखोंचा खर्च झाला असताना नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी केवळ 18 हजार रुपये देण्यात आले आहेत.

पंचनामा अहवालानुसार मदत

ऐन काढणीला महिन्याचा कालावधी असतानाच अवकाळी पावसामुळे फळबागांसह इतरही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. द्राक्ष आणि आंबा फळपिकाचे अधिक नुकसान झाल्याने पंचनामे करण्याची प्रक्रिया लवकर सुरु झाली होती. त्यामुळेच नाशिक, सांगली, इंदापूर पुणे येथील नुकसानीचे अहवाल कृषी विभागाकडे सादर करण्यात आले आहेत. सर्वच जिल्ह्यात पंचनामे झाले असले तरी सोलापूर जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशच संबंधित विभागाला नव्हते. त्यामुळे अद्यापही शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.

अशी आहे नुकसानभरपाईचे स्वरुप

नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम फळबागांवर तर झालाच होता पण काही भागांमध्ये रब्बीची दुबार पेरणीही करावी लागली होती. असे असताना आता द्राक्षबागांच्या नुकासानीपोटी हेक्टरी 18 हजार रुपये मदत करण्यात आली आहे. इंदापूर तालुक्यातील 61 गावांमधील 825 द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे 815 हेक्टरावरील द्राक्षाचे नुकसान झाले होते. त्याबदल्यात तालुक्याला 74 लाख 73 हजार रुपये मिळाले असल्याचे तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब रुपनकर यांनी सांगितले आहे.

अद्यापही शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

नुकसानभरपाईची रक्कम तोकडी असली तरी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. अवकाळीमुळे उत्पादनात तर घट झालीच आहे पण आता मालावर देखील फरक आहे. महिन्याभराच्या कालावधीनंतरही अजून नुकसानीचा अहवालच कृषी विभागाकडे सादर झालेले नाहीत. ज्या जिल्ह्यातून अहवाल सादर होईल त्यांना मदत केली जात आहे. पण नुकसानीच्या तुलनेत होत असलेली मदत ही नाममात्र असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.

संबंधित बातम्या :

Sugarcane Sludge : ऊसाचे गाळप कासवगतीने, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा पाथरी येथे रास्तारोको

तूर खरेदी केंद्र सुरु होत असतानाच व्यापाऱ्यांचा असा ‘हा’ निर्णय, शेतकरीही गेले चक्रावून

ठरलं तर मग : शेतकऱ्यांना मिळाला फरदड कापसाला योग्य पर्याय, आता आंतरपिकातून उत्पादनही वाढणार