AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठरलं तर मग : शेतकऱ्यांना मिळाला फरदड कापसाला योग्य पर्याय, आता आंतरपिकातून उत्पादनही वाढणार

कापसाच्या दरावर फरदड कापसाचे उत्पादन घ्यायचे का नाही याबाबत द्वीधा मनस्थिती शेतकऱ्यांची होती. मात्र, काही दिवसांमध्येच फरदड कापसामुळे होणारे नुकसान शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आता फरदडची काढणी आणि रब्बी हंगामात सुर्यफूल पेरणी व कांद्याच्या लागवडीवर भर दिला जात आहे.

ठरलं तर मग : शेतकऱ्यांना मिळाला फरदड कापसाला योग्य पर्याय, आता आंतरपिकातून उत्पादनही वाढणार
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 30, 2021 | 2:08 PM
Share

औरंगाबाद : कापसाच्या (Cotton crop) दरावर फरदड कापसाचे उत्पादन घ्यायचे का नाही याबाबत द्वीधा मनस्थिती शेतकऱ्यांची होती. मात्र, काही दिवसांमध्येच फरदड कापसामुळे होणारे नुकसान शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आता फरदडची काढणी आणि रब्बी हंगामात सुर्यफूल पेरणी व (onion cultivation) कांद्याच्या लागवडीवर भर दिला जात आहे. जानेवारी अखेरपर्यंत कांदा लागवडीसाठी पोषक वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी कापूस काढणीवर भर दिलेला आहे. दुसरीकडे कापसाचे दर वाढूनही शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या आवाहनाला प्रतिसाद देत अखेर फरदड कापूस काढणी केली आहे.

कांदा लागवडीवर शेतकऱ्यांचा भर

सध्या मराठवाड्यासह उत्तर भारतामध्येही कांदा लागवडीवर शेतकऱ्यांनी भर दिलेला आहे. ऊसामध्येही आंतरपिक म्हणून कांद्याची लागवड केली जात आहे. सध्या कांद्याच्या दरात वाढ झाली रब्बी हंगामातील कांद्याचे क्षेत्र हे वाढत आहे. यातच फरदड कापसाचे क्षेत्र हे रिकामे झाल्यामुळे कांदा किंवा सुर्यफूलाचा पेरा केला जात आहे. मध्यंतरी वातावरणातील बदलामुळे कांद्याच्या रोपाचे नुकसान झाले होते. पण बियाणांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पेरा केलेला आहे. दरवर्षी पारंपारिक पिकांना बाजारभाव हा नियंत्रणातच असतो. त्यामुळे हरभरा, गहू याचे पिक न घेता शेतकरी नगदी पीक असलेल्या कांद्यावर भर देत आहेत.

सुर्यफूल पेरणीयोग्य शेतजमिन

काळाच्या ओघाच सुर्फूलाच्या क्षेत्रामध्ये मराठवाड्यात घट झाली होती. पण आता पोषक वातावरण आणि तेलबियाला मिळत असलेल्या दरामुळे पुन्हा सुर्यफूलाचे क्षेत्रात वाढ होत आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, परभणी जिल्ह्यांमध्ये क्षेत्र वाढत आहे. शिवाय आता फरदड कापसाचे क्षेत्र रिकामे झाले असल्याने कापूस किंवा सुर्यफूल या दोन पिकांवरच शेतकऱ्यांचा भर आहे. जानेवारी अखेरपर्यंत पेरा झाला तरी उत्पादनात फरक पडणार नसल्याने शेतकरी निश्चिंत आहेत.

फरदड कापसामुळे काय होते?

सध्या वातावरणातील बदलामुळे कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच कापूस शेतामध्ये कायम ठेवला तर अळीचा प्रादुर्भाव हा वाढणारच आहे. एवढेच नाही तर फरदड कापसाचा शेत जमिनीवरही परिणाम होत असतो. आगामी वर्षात उगवण क्षमतेवर त्याचा परिणाम होतो. तर आता रब्बी हंगामातील पिकांची उगवण झाली आहे. या फरदड कापसावरील बोंडअळीचा प्रादुर्भाव इतर पिकांवर होण्याचा धोका आहे. त्यामुळे तात्पूरत्या फायद्यासाठी शेतकऱ्यांनी आगामी हंगामातील आणि शेतजमिनीचे नुकसान करुन घेऊ नये असा सल्ला कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या :

Agricultural pump : वीजप्रश्न पेटला, अख्खं गाव बैल-बारदाणा घेऊन महावितरणच्या दारी

अतिवृष्टीची नुकसनभरपाई जमा होताच अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे, काय आहे शिवारातील चित्र?

दोन दिवस धोक्याचेच, वातावरणानुसार शेती पिकांची ‘अशी’ घ्या काळजी, कृषितज्ञांचा शेतकऱ्यांना काय सल्ला?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.