AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 Final : वर्ल्ड कप विजेत्या संघाला किती कोटी? पराभूत संघाचा आकडा ठरला

ICC T20i World Cup 2026 Prize Money : टीम इंडियाने 2024 साली वर्ल्ड कप जिंकल्यानंतर बीसीसीआयने 125 कोटी रुपयांचं बक्षिस जाहीर केलं होतं. हे बक्षिस आयसीसी व्यतिरिक्त देण्यात आलं होतं. टीम इंडियाला यंदा पुन्हा एकदा बीसीसीआयकडून खास बक्षिस मिळवण्याची संधी आहे.

T20 World Cup 2026 Final : वर्ल्ड कप विजेत्या संघाला किती कोटी? पराभूत संघाचा आकडा ठरला
ICC T20i World Cup 2026 Prize MoneyImage Credit source: Tv9 Via Ai
| Updated on: Mar 08, 2026 | 12:19 AM
Share

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या पर्वातील (Icc T20i World Cup 2026) अंतिम सामन्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील महाअंतिम सामन्यात 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमधील 2 संघ आमनेसामने असणार आहेत. इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी थेट लढत होणार आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 9 मार्चला न्यूझीलंडला पराभूत करुन 23 जून 2013 नंतर टीम इंडियाने पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली होती. त्यानंतर आता दोन्ही संघ टी 20i वर्ल्ड कप फायनल निमित्ताने आमनेसामने आले आहेत. रोहित शर्मा याच्यानंतर कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादव याच्यावर भारताला सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकून देण्याची जबाबदारी आहे. अशात कर्णधार सूर्या आणि टीम इंडियाच्या कामगिरीवर चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

गतविजेता टीम इंडिया ट्रॉफी राखण्यात यशस्वी होणार?

टीम इंडिया गतविजेता असल्याने सूर्यासेनेसमोर वर्ल्ड कप ट्रॉफी राखण्याचं आव्हान आहे. तर न्यूझीलंड सूर्यकुमार यादव याच्या टीमवर मात करुन 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमधील पराभवाची परतफेडीसह पहिला टी 20i वर्ल्ड कप जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण मैदान मारतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हा अंतिम सामना जिंकणारा संघ विश्वविजेता ठरेल.  विजयी संघ मालामालही होईल. वर्ल्ड कप विजेत्या आणि उपविजेत्या संघाला बक्षिस म्हणून किती रक्कम मिळेल? हे आपण जाणून घेऊयात.

वर्ल्ड कप विजेत्या संघाला किती कोटी?

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, टी 20i वर्ल्ड कप विजेत्या संघाला ठरल्यानुसार 3 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास साडे 27 कोटी रुपये इतकी रक्कम बक्षिस म्हणून मिळणार आहे. वर्ल्ड कप जिंकल्यास टीम इंडिया मालमाल होईल. तसेच बीसीसीआयकडूनही भारतीय संघासाठी विशेष बक्षिस म्हणून रक्कम जाहीर करण्यात येऊ शकते.

उपविजेत्या संघाचीही चांदी होणार, किती कोटी मिळणार?

तसेच उपविजेत्या संघालाही चांगलीच रक्कम मिळणार आहे. अंतिम सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाला 14 कोटी 65 लाख रुपये बक्षिस म्हणून देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक संघाला आयसीसीकडून प्रत्येक विजयासाठी ठराविक रक्कम देण्यात येणार आहे. तसेच सहभागी झालेल्या 20 संघांनाही आयसीसी रक्कम देणार आहे. त्यामुळे आयसीसीकडून प्रत्येक संघाला कामगिरीच्या जोरावर बक्षिस रक्कम देण्यात येणार आहे.

Follow Us
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे....
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?.
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला.
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?.
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला.
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक.