AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्याकडून असे कधीही होणार नाही… मनोज जरांगे पाटील बोलले स्पष्टच, थेट म्हणाले, मराठा समाज..

मनोज जरांगे पाटील आज कोल्हापूर दाैऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यादरम्यान त्यांनी कोल्हापूर आणि सातारा गॅझेटबद्दल मोठे विधान केले. सरकारवर विश्वासघात केले हे अंतिम सत्य पण आता त्यांच्या सुधारणा झाल्याचे त्यांनी म्हटले.

माझ्याकडून असे कधीही होणार नाही... मनोज जरांगे पाटील बोलले स्पष्टच, थेट म्हणाले, मराठा समाज..
Manoj Jarange Patil
| Updated on: Jun 15, 2026 | 11:43 AM
Share

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आज कोल्हापूर दाैऱ्यावर आहेत. अंबाबाईचे दर्शन जरांगे यांनी घेतले. यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मोठे विधान केले. जरांगे पाटील यांनी म्हटले की, लवकर पाऊस पडू दे… बळीराजा सुखी होऊ दे.. बॉम्बे संस्थेचे गॅझेट, सातारा संस्थानाचे गॅझेट, कोल्हापूर, मिरज, आैंध आणि पुणे हे पूर्वीपासून सांगतो की, हे घेतलेच पाहिजे, कुठल्याही परिस्थितीमध्ये. आता काय टप्य्यात टप्प्यात सर्व चाललंय. आता हैद्राबाद गॅझेट झाले. आता ते सातारा संस्थानाचे घेत आहेत. करता करता सर्वच जाणार आहेत. आता कसे असते एखादा विषय एकदम नसतो होत. त्याला अनेक अडचणी अनेक संकटे असतात. त्रासदायकही काही व्यक्ती असतात. आपण तिथेच जाऊ जिथे आपल्याला जायचे आहे. पण जरा टप्प्याने जाऊयात, जरा दमाने. या राज्याचे मी गरीबाचे लेकरू आहे. प्रामाणिकपणे मी लढतोय.

माझ्याकडून असे कधीही होणार नाही की, इकडे आरक्षण दिले तिकडे नाही. राज्यातील सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत मी थांबणार नाही. महाराजांनी हाक द्यावी आणि आम्ही सर्वांनी उभे राहावे. त्यांनी सांगितले की, एकदा यावेच लागेल तर येतो. तब्येत बरी झाली की, महाराजांच्या भेटीला आलोय. सरकारला गॅझेटियलबाबत सद्बुद्धी येई देत , असेही जरांगे पाटील यांनी म्हटले. यादरम्यान रोहित पवार यांच्या आंदोलनाबद्दलही बोलताना मनोज जरांगे पाटील दिसले.

मनोज जरांगे पाटील यांनी रोहित पवार यांची पंढरपुरमध्ये जाऊन भेट घेतली. काल रात्री उशिरा रोहित पवार यांनी आपले आंदोलन मागे घेतले. रोहित पवार हे शेतकरी कर्ज माफीच्या मुद्द्यात उपोषणाला बसले होते. पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, सातारा गॅझेट घेत आहेत. कोल्हापूरच्या गॅझेटबद्दलची चर्चा आहे. आता महाराजांची भेट घेऊन यात त्यांचे काय म्हणणे आहे यावर चर्चा करून निर्णय घेऊ.

इथून मागे सरकार आम्हाला फसवत गेलं, हे अंतिम सत्य आहे. पण आताच्या काळात थोडा विश्वास बसला आहे. कारण त्यांनी आता चांगली प्रक्रिया केली. जीआर काढणे, शिंदे समितीला मुद्तवाढ देणे. 58 नोंदीचे प्रमाणपत्र वाटप करणे, आदेश देणे रोखू नका. हैद्राबाद गॅझेटनुसार त्यांनी एसओपी दिली, त्याबाबतचे आदेश दिले, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

Follow Us
शिवसेना शिंदे गटाला जबर धक्का! कागदपत्रांचा घोळ, छत्रपती संभाजीनगर...
ShivSena | शिवसेना शिंदे गटाला जबर धक्का! कागदपत्रांचा घोळ अन् छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली, काय घडतंय?
पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर प्रकरणावरून...
Delhi | पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर दानपेटी प्रकरणावरून दिल्लीत राजकीय रणकंदन
खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Pune | खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; प्रशासनाचा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
FDA ला हायकोर्टाचा दणका! 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
FDA ला हायकोर्टाचा दणका! मंत्रालयाच्या कँटीनमध्ये माश्या, धूळ; 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
भिवंडीत भीषण दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकजण...
Bhiwandi Building collapsed | भिवंडीत भीषण दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकजण अजुनही ढिगाऱ्याखाली
लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
Rupali Thombare Patil | लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; चिमुकल्यांकडून पाय धुऊन घेतल्याप्रकरणी ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! दीपकेंचा आरोप
Abhijeet Dipke | विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप
अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन!
Uddhav Thackeray | अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन! आंदोलनाच्या यशानंतर मोठी चर्चा
तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस, कँटीन बंद करण्याचे आदेश
अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद...
Sansad Bhavan Park | अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद भवनाबाहेर आंदोलन