AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : कोरोनात खरेदी केलेल्या सेफ्टी किटचा चहावाल्याकडून असाही वापर, पहिल्यांदा सगळे घाबरले मग समजलं अजब लॉजिक

कोरोना काळात पीपीई किटचा वापर करणे फार महत्त्वाचे होते. काही संस्थांनी तो किट दानही केले होते. आता कोरोना गेला त्या किटचे करायचे काय असा प्रश्न एका चहावाल्याला पडला. पण त्याने त्याचा असा काही जुगाड केलाय . त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

VIDEO :  कोरोनात खरेदी केलेल्या सेफ्टी किटचा चहावाल्याकडून असाही वापर, पहिल्यांदा सगळे घाबरले मग समजलं अजब लॉजिक
ppe kit And chaivala viral videoImage Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 04, 2026 | 7:11 PM
Share

कोरोनाच्या काळात बाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी लागत होती. बाहेर जाणे टाळले जात होते आणि ज्यांना बाहेर जाण्याची खरंच गरज होती. त्यांच्यासाठी कोरोना किट म्हणजेच पीपीई किट वापरण्याची सक्ती करण्यात आली होती. काही सेवाभावी संस्थांनी लोकांना पीपीई किट वाटले देखील होते.आता कोरोना जाऊन जवळपास 7 वर्ष झाली. त्यामुळे बऱ्याच जणांचे किट तसेच पडून असणार, पण या चहाावाल्याने त्याचा असा काही वापर केलाय त्यामुळे तुमचे डोके तर चक्रावेलचं, पण पोट देखील हसून हसून दुखेल.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये संपूर्ण पीपीई किट घालून लिफ्टमध्ये एक चहावाला उभा असल्याचं दिसतं. त्याच्या अंगावर तो पीपीई किट असल्यामुळे लिफ्टमधील काही लोक त्याच्याकडे आश्चर्याने पाहत आहेत. त्या भयानक कोरोनात या किटचे प्रचंड महत्त्व होते. त्यामुळे आता तो किट एखाद्याने घातलाय हे पाहून निश्चितच आश्चर्य तर वाटणारचं.

व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीने त्या चहावाल्याला तो किट घालण्याचे कारण विचारले, त्यावर चहावाला असं काही सांगतो, ज्यामुळे हसून हसून तुमचे पोट दुखू लागेल,डोके चक्रावेल. चहावाला म्हणतो त्याला कोणताही आजार झालेला नाही किंवा तो आजारीही नाही.पावसात भिजण्यापासून वाचण्यासाठी त्याने हा किट घातला आहे.

View this post on Instagram

A post shared by Kamal Midha (@kamal_midha)

विशेष म्हणजे हा चहावाला सचिवालयाच्या इमारतीत अनेक वर्षांपासून चहा विकत असल्याचे व्हिडिओ बनवणारी व्यक्ती सांगते. त्यानंतर चहावाला आपल्याकडे असलेली चहाची किटली आणि ग्लासही दाखवतो. इमारतीतील लोक त्याला ओळखतात. त्याचा हा अवतार ते लोक रोज पाहतात. त्यामुळे कसलीच भीती नाही. मात्र त्या लिफ्टमध्ये असलेला एक व्यक्ती हसून सांगतो कि आम्ही मात्र याला असा बघून घाबरलो.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनीही त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी चहावाल्याच्या साधेपणाचं आणि हसतमुख स्वभावाचं कौतुक केलं आहे. तर काहींनी कोरोनाच्या काळात घेतलेला पीपीई किट आता असा उपयोगी पडतोय अशी टिप्पणी केली आहे. तर काहींनी हा जुगाड भारताच्या बाहेर जाता कामा नये . अशी टिप्पणी केली आहे. पण हा व्हिडिओ कुठला आहे? कुठून शेअर करण्यात आला आहे याची अद्याप माहिती समोर आलेली नाही.

Follow Us
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
CM Devendra Fadnavis : दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यांत 5 हजार रुपये जमा; मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही ठणठणीत राहा
बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला...
Beed : बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला, चालकाचा होरपळून मृत्यू
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र...
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र, जरांगे पुरावे देणार
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
Mahayuti : महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप, शीतल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत