फक्त 24 वर्षांची होती तब्बू, सुंदर डान्समुळे सुपरहिट झालेलं गाणं; पाकिस्तानी गायकाच्या कव्वालीशी आहे कनेक्शन, आजही प्रसिद्ध
1996 साली प्रदर्शित झालेल्या एका बॉलिवूड सिनेमानं तब्बल 30 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. या चित्रपटातलं गाणंही प्रचंड गाजलेलं. या गाण्यामध्ये अभिनेत्री तब्बू ही दिसून आली होती. तिने या गाण्यामध्ये प्रचंड सुंदर अभिनय केलेला.

काही जुन्या बॉलिवूड चित्रपटांची गाणी ही अनेकांना आजही आवडतात. या सर्व गाण्यांच्या निर्मितीमागे अनेक रंजक किस्से असतात. त्यातच आता 1996 साली प्रदर्शित झालेल्या जीत या सिनेमातला एक खास किस्सा समोर आला आहे. या चित्रपटामधील हे गाणे अत्यंत लोकप्रिय असून, या गाण्यामध्ये अभिनेत्री तबू दिसून येते. या गाण्याचे बोल आहेत. दिल का क्या करे साहिब. या गाण्यामध्ये बॉलिवडू अभिनेत्री तब्बू हिनने आपल्या मोहक नृत्याने प्रक्षेकांना मंत्रमुग्ध केले होते. जेव्हा हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि हे गाणं लोकांच्यासमोर आलं तेव्हा तब्बूचं वय केवळं 24 वर्ष एवढंच होतं. याशिवाय या गाण्याचं कनेक्शन सुप्रसिद्ध पाकिस्तानी गायक नुसरत फतेह अली खान यांच्या एका लोकप्रिय कव्वालीशीही आहे. कविता कृष्णमूर्ती यांच्या सुमधूर आवाजाने तब्बूवर चित्रित या गाण्याला एक वेगळी ओळख दिली आहे.
जीतमधील हे गाणं आजही त्याच्या सुमधूर चालीमुळे तसेच गायनामुळे लोकप्रिय आहे. हे गाणे गायिका कविता कृष्णमूर्ती यांनी गायले आहे. तर संगित हे नदीम-श्रवण यांनी दिले होते. तर गीतकार होते समीर. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा नुसरत फतेह अली खान यांच्याशी असलेला थेट संबंध. दिल का क्या करे साहिब हे गाणे त्यांच्या दिल पे जख्म खाती हैं या कव्वालीवरुन प्रेरित आहे. पण सिनेमामध्ये हे गाणे अतिशय वेगळ्या शैलीमध्ये दाखवण्यात आले आहे. या गाण्यामध्ये अभिनेत्री तब्बू ही सनी देओलही दिसून येतो. कव्वालीचा बाज आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजाची जादू या गाण्यामध्ये अनुभवायला मिळते.
सिनेमाच्या कथानकाबद्दल सांगायचे झाल्यास, जीत हा सिनेमा 23 ऑगस्ट 1996 ला प्रदर्शित झाला. या सिनेमाचं दिग्दर्शन गे राज कंवर यांनी केलेलं. तर निर्मिती ही साजिद नाडियाडवाला यांनी केलेली. सनी देओल, सलमान खान, करिश्मा कपूर, तब्बू आणि अमरिश पुरी यांच्या सिनेमाममध्ये भूमिका आहेत. चित्रपटाची कथा अंडरवर्ल्डचा डॉन गजराजभोवती फिरते. ज्याच्यासाठी सनी देओल काम करत असतो. त्याच्या पात्राचे नाव करण आहे. तर करिश्माच्या पात्राचे नाव काजल आहे. ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण काजलच्या जीवनात राजू म्हणजे सलमान खानही असतो. अशा त्रिकोणी प्रेमाची, त्यागाची आणि अत्यंत खेळवून ठेवणारी ही गोष्ट आहे. तब्बूने या सिनेमामध्ये तुळशीबाई हे पात्र साकारलं आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरही प्रचंड गाजला होता. या सिनेमाने 30कोटींचा गल्ला जमवलेला.
