AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi : दुसऱ्या सामन्यात अपेक्षा जागवल्या पण आज श्रीलंकेविरुद्ध वैभव सूर्यवंशी पुन्हा फेल

Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीने अफगाणिस्तान विरुद्ध स्फोटक सुरुवात केली होती. त्याने अपेक्षा निर्माण केल्या होत्या. त्याला सूर गवसल्याचे संकेत मिळाले होते. पण आज श्रीलंकेविरुद्ध पुन्हा वैभव सूर्यवंशी फेल ठरला. सिनियर टीम इंडियात संधी तर त्याला मिळालीय. पण त्यासाठी त्याची बॅट तळपणं सुद्धा तितकच गरजेच आहे.

Vaibhav Sooryavanshi : दुसऱ्या सामन्यात अपेक्षा जागवल्या पण आज श्रीलंकेविरुद्ध वैभव सूर्यवंशी पुन्हा फेल
Vaibhav Sooryavanshi Image Credit source: PTI
| Updated on: Jun 15, 2026 | 10:55 AM
Share

टीम इंडियाचा स्टार प्लेयर वैभव सूर्यवंशी आज श्रीलंका ए विरुद्ध तिसऱ्या सामन्यात पुन्हा अपयशी ठरला. दांबुलाच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर भारत अ आणि श्रीलंका अ संघात सामना सुरु आहे. श्रीलंका अ ने टॉस जिंकून पहिली फिल्डिंग घेतली. श्रीलंका, भारत आणि अफगाणिस्तान या तीन देशांच्या ‘अ’ संघात तिरंगी मालिका सुरु आहे. भारतासाठी आजचा सामना महत्वाचा आहे. कारण फायनलमध्ये प्रवेश मिळवण्याची लढाई अजून रोमांचक बनली आहे. श्रीलंका ए विरुद्ध प्रभसिमरन सिंह आणि वैभव सूर्यवंशीची जोडी मैदानात उतरली. वैभवने नेहमीप्रमाणे आक्रमक सुरुवात केली. पण त्याला ती लय पकडून ठेवता आली नाही. वैभव सूर्यवंशी 14 चेंडूत 21 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. वैभवने 3 चौकार आणि एक षटकार लगावला.

वैभव सूर्यवंशी चौथ्या ओव्हरमध्ये बाद झाला. त्याने प्रभसिमरन सिंह सोबत पहिल्या विकेटसाठी 29 धावा जोडल्या. श्रीलंका ए विरुद्ध पहिल्या सामन्यात सुद्धा वैभव सूर्यवंशी अपयशी ठरला होता. त्यावेळी तो 14 धावांवर बाद झालेला. नंतर अफगाणिस्तान अ विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात वैभवने 22 चेंडूत 44 धावा फटकावून सूर गवसल्याचे संकेत दिले होते. त्याने 200 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या होत्या. वैभव सूर्यवंशीसाठी हा दौरा खूप महत्वाचा आहे. त्याची सिनियर टीम इंडियात निवड झाली आहे. टीम इंडिया आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात वैभवला सिनियर टीम इंडियाकडून संधी मिळू शकते. पण त्यासाठी सध्या सुरु असलेल्या तिरंगी मालिकेत त्याने दमदार प्रदर्शन करणं गरजेचं आहे.

प्रदर्शनात सातत्य आवश्यक

आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशीने 16 सामन्यात 750 पेक्षा जास्त धावा केल्या. आपली निवड करण्यासाठी त्यांनी बीसीसीआयच्या निवड समितीला भाग पाडलं आहे. तो अवघ्या 15 वर्षांचा असून टॅलेंट त्याच्यात कुटून भरलेलं आहे. टीम इंडियात स्थान टिकवून ठेवण्यासाठी त्याच्या प्रदर्शनात सातत्य आवश्यक आहे. म्हणून या दौऱ्यात वैभवची बॅट तळपणं खूप गरजेचं आहे. दांबुलाचा पीच फलंदाजीसाठी अनुकूल मानला जातो. सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये गोलंदाजांना पीचकडून काही मदत मिळू शकते. पण नंतर खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल होत जाईल. मधल्या षटकात स्पिन गोलंदाज प्रभावी ठरु शकतात. त्यांना पीचकडून टर्न मिळू शकतो. त्यामुळे धावगती नियंत्रणात ठेवता येईल.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं