Rohit Pawar Protest | रोहित पवारांचं उपोषण अखेर स्थगित! मात्र मागण्या मान्य नाही झाल्या तर 4 जुलैला पुन्हा रणशिंग
पंढरपूरमध्ये शेतकरी कर्जमाफीच्या जीआरमध्ये सुधारणा करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले आमदार रोहित पवार यांचे अन्नत्याग आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देत रोहित पवार यांच्याशी चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदनही त्यांच्याकडून स्वीकारण्यात आले.
पंढरपूरमध्ये शेतकरी कर्जमाफीच्या जीआरमध्ये सुधारणा करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले आमदार रोहित पवार यांचे अन्नत्याग आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देत रोहित पवार यांच्याशी चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदनही त्यांच्याकडून स्वीकारण्यात आले.
आंदोलनस्थळी झालेल्या चर्चेदरम्यान गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला. त्यानंतर सरकारकडून सकारात्मक भूमिका घेण्यात येणार असल्याचा विश्वास व्यक्त करत रोहित पवार यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला.
रोहित पवार यांनी सांगितले की, 22 जूनपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे. तसेच 30 जूनपासून कर्जमाफीची अंमलबजावणी होणार असल्याने आवश्यक सुधारणा त्याआधी करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी त्यांनी शेतकरी नेते आणि विविध पक्षांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी सहभागी करण्याची मागणी केली. या बैठकीत राजू शेट्टी, अजित नवले, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, रविकांत तुपकर, ठाकरे गटाचे नेते, शेकापचे जयंत पाटील तसेच महादेव जानकर यांच्यासह इतर शेतकरी नेत्यांना सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
रोहित पवार यांनी सरकारला इशारा देत सांगितले की, कर्जमाफीतील दोन महत्त्वाच्या अटींबाबत समाधानकारक निर्णय न झाल्यास 4 जुलैपासून मराठवाड्यात पुन्हा आंदोलन सुरू करण्यात येईल. मात्र, सध्या चर्चेला संधी देण्यासाठी आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करून योग्य तो तोडगा काढला जाईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी रोहित पवार यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. चर्चेच्या माध्यमातून मार्ग निघेल, असा विश्वास दोन्ही बाजूंनी व्यक्त करण्यात आला आहे.
Published on: Jun 15, 2026 11:08 AM
रोहित पवारांचं उपोषण अखेर स्थगित! मात्र मागण्या मान्य नाही झाल्या तर..
तुकाराम मुंढे परळीत येणार म्हणताच पानपट्ट्यांवर टाळे?
काळाचा घाला! 15 प्रवाशांची कार विहिरीत; अन् पुढे जे झालं.....
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...

