AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक व्यक्ती जास्तीत जास्त किती लिटर पेट्रोल खरेदी करू शकतो? भारतामध्ये काय आहे नियम? जास्त आढळल्यास काय आहे शिक्षा?

सध्या मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे, ज्यामुळे इंधन टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे, मात्र तुम्हाला हे माहिती आहे का? की एक व्यक्ती जास्तीत जास्त किती पेट्रोल किंवा डिझेलचा साठा करू ठेवू शकते?

एक व्यक्ती जास्तीत जास्त किती लिटर पेट्रोल खरेदी करू शकतो? भारतामध्ये काय आहे नियम? जास्त आढळल्यास काय आहे शिक्षा?
petrol Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 07, 2026 | 11:30 PM
Share

मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. इस्त्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरूच आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत अमेरिका आणि इस्त्रालयने केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं मोठं नुकसान झालं आहे. मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम हा इंधन पुरवठ्यावर झाला आहे. जगात असे अनेक देश आहेत, ज्यांना इंधनाच्या स्वरुपात या यु्द्धाची मोठी झळ पोहोचली आहे. त्यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. आपण पहातो अनेकदा अशा देखील बातम्या समोर येत आहेत, की पेट्रोल, डिझेलचे दर वाढणार आहेत, पेट्रोल, डिझेल महाग होणार आहे, त्यातच इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याची अफवा देखील पसरली होती, त्यामुळे लोकांनी पेट्रोल, डिझेलच्या खरेदीसाठी पेट्रोल पंपावर मोठी रांग लावल्याचं चित्र पहायला मिळालं. आज आपण या सर्व पार्श्वभूमीवर जाणून घेणार आहोत की, एखादा व्यक्ती भारतामध्ये जास्तीत जास्त किती पेट्रोल किंवा डिझेलची खरेदी करु शकतो? आणि जर त्यापेक्षा जास्त पेट्रोलचा साठा त्याकडे आढळला तर त्याला काय शिक्षा होऊ शकते?

एकावेळी जास्तीत जास्त किती इंधनाची खरेदी करता येते?

नियमानुसार तुमच्या वाहनाच्या इंधन टाकीची जेवढी क्षमता आहे, तेवढं तुम्ही पेट्रोल खरेदी करू शकता. पेट्रोल, किंवा डिझेल गाडीच्या टाकीमध्ये न भरता इतर साधनांमधून जसं की बाटली सारख्या एखाद्या वस्तूमधून त्याची वाहतूक करण्यास मनाई आहे. एखादा सामान्य व्यक्ती किती लिटर पर्यंत इंधन आपल्या घरात स्टोअर करू शकतो? याचे देखील नियम बनवण्यात आले आहेत. पेट्रोल-डिझेल साठवणुकीचा कायदा 2002 अनुसार ज्या व्यक्तीकडे अधिकृत लायन्स नाही, अशी व्यक्ती एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच आपल्या घरात पेट्रोलचा साठा करू शकते. या काद्यानुसार सामान्य माणूस हा आपल्या घरात जास्तीत जास्त 30 लिटर पर्यंत पेट्रोल, किंवा डिझेलची साठवणूक करू शकतो. मात्र त्यासाठी हे इंधन सुरक्षित ठिकाणी साठवणे गरजेचं आहे, ज्यामुळे कुठल्याही प्रकारचा अपघात होणार नाही.

अधिक साठा आढळल्यास काय शिक्षा होते?

जर समजा एखाद्या व्यक्तीला 30 लिटरपेक्षा अधिक पेट्रोल किंवा डिझेलचा साठा आपल्या घरात ठेवायचा असेल तर त्याला त्यासाठी स्थानिक पातळीवरील प्रशासकीय यंत्रणेची परवानगी घ्यावी लागते, आणि समजा त्याने असंही काही केलं नसेल आणि जर त्याच्या घरात मर्यादेपेक्षा जास्त पेट्रोल आढळून आलं तर त्याला पहिल्यावेळी एक महिना जेल आणि एक हजार रुपयापर्यंत दंड होतो. तसेच तो दुसऱ्यांदा पकडाला गेल्यास त्याला त्यासाठी तीन महिन्यांची शिक्षा तसेच 5 हजार रुपये दंड होतो.

Follow Us
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार