AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli: IND vs NZ ODI मालिकेपूर्वी विराटची बिकट अवस्था, नेटमध्ये नवख्या गोलंदाजासमोर उडाली घाबरगुंडी, Video Viral

Virat Kohli Video Viral: भारत न्यूझीलंड वनडे मालिकेपूर्वी विराट कोहलीची अवस्था बिकट पाहायला मिळत आहे. सरावा दरम्यानचा आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Virat Kohli: IND vs NZ ODI मालिकेपूर्वी विराटची बिकट अवस्था, नेटमध्ये नवख्या गोलंदाजासमोर उडाली घाबरगुंडी, Video Viral
| Updated on: Nov 01, 2026 | 12:49 PM
Share

IND vs NZ ODI: टीम इंडियाने टी-२० मालिका आधीच जिंकली असून, मालिकेचा अंतिम सामना आज होणार आहे. यानंतर, ४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेवर सर्वांच्या नजरा असतील. टीम इंडियाने त्यासाठी तयारीला सुरुवात केली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा सराव करतानाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ला़डक्या रोकोंना पाहता येणार म्हणून चाहते नेहमीच भलतेच उत्सुक असतात. आता सरावात विराट कोहलीची घाबरगुंडी कशी उडाली ते पाहा.

कोहली आणि रोहित सध्या फक्त एकदिवसीय सामने खेळतात. जेव्हा ते नेटमध्ये आले, तेव्हा सर्वांचे लक्ष त्यांच्यावर केंद्रित झाले होते, पण या नेट सत्रादरम्यान एक अनपेक्षित गोष्ट घडली. एका नवख्या गोलंदाजाने कोहलीला चांगलेच अडचणीत आणले. हा वेगवान गोलंदाज आकिब नबी होता, ज्याला प्रसिद्ध कृष्णाच्या जागी पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी टीम इंडियाच्या संघात स्थान देण्यात आले होते. नबी गेल्या दोन सामन्यांसाठी संघाचा भाग होता, पण कृष्णाच्या दुखापतीनंतर तो आता संपूर्ण एकदिवसीय मालिका खेळणार आहे. आकिबने नेटमध्ये कोहलीला चांगलेच अडचणीत आणले. वृत्तानुसार, आकिब सतत कोहलीच्या बॅटची बाहेरील कड घेत होता. त्याच्या बाहेरच्या बाजूला जाणाऱ्या चेंडूंमुळे कोहली त्रस्त होता.

आकिबने चेंडू दोन्ही बाजूंना स्विंग करून कोहलीला अडचणीत आणले. त्याच्या गोलंदाजीने हे दाखवून दिले की, ज्या फॉर्मसाठी त्याचे कौतुक झाले आहे आणि ज्यामुळे त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळाले आहे, तो फॉर्म अजूनही कायम आहे.

सुरुवातीला, आकिबविरुद्ध खेळणे कोहलीसाठी कठीण ठरले. तो फसत होता आणि वारंवार पॅड्सवर चेंडू मारत होता, पण कोहलीही कमबॅकसाठीच ओळखला जातो. विराटने लगेचच पुनरागमन केले आणि पुन्हा एकदा आकिबने केलेल्या गोलंदाजीवर त्याने चांगले फटके मारले.  आता विराट कोहली आणि रोहित शर्मा मैदानावर खेळताना ४ नोव्हेंबरपासून दिसणार आहे. पाच वनडे सामन्यांची मालिका असणार आहे. आता विराट, रोहितसाठी स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध करण्याची सुवर्ण संधी असणार आहे.

Follow Us
एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत..
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन
राम पुरणेकरांनी घेतली CM फडणवीसांची भेट?
प्रदीप पुरणेकर प्रकरणाला नवे वळण! मुलगा राम पुरणेकरांनी घेतली फडणवीसांची भेट, नेमकं सत्य काय?
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेत होणार
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेतही होणार सहभागी!
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदे होणार सहभागी
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने वळल्या नजरा
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे
Sangli District Bank Election 2026 : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी पक्षाला दणका?
दिवाळी तोंडावर असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल...
दिवाळी काही दिवसांवरच असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका!