AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अतिवृष्टीची नुकसनभरपाई जमा होताच अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे, काय आहे शिवारातील चित्र?

दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरवात झाली आहे. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे तर नुकसान होत आहेच शिवाय प्रशासकीय यंत्रणा आणि अधिकच्या खर्चाचा भर प्रशासनावरही तेवढाच पडत आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, परभणी, बीड जिल्ह्यात पावसाने अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने फळपिकांसह रब्बी आणि खरिपातील पिकांचेही नुकसान झाले आहे.

अतिवृष्टीची नुकसनभरपाई जमा होताच अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे, काय आहे शिवारातील चित्र?
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 30, 2021 | 12:31 PM
Share

औरंगाबाद : निसर्गाच्या लहरीपणाचे चक्र (Kharif season) खरिपानंतर सध्या रब्बी हंगामातही सुरुच आहे. (Heavy Rain) अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची आर्थिक मदत या महिन्याच्या सुरवातीलाच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली होती. शिवाय काही शेतकऱ्यांची रक्कम ही प्रक्रियेतच अडकलेली आहे. असे असताना आता दोन दिवसांपूर्वी झालेल्या (Untimely rains) अवकाळी पावसाच्या नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरवात झाली आहे. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे तर नुकसान होत आहेच शिवाय प्रशासकीय यंत्रणा आणि अधिकच्या खर्चाचा भर प्रशासनावरही तेवढाच पडत आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, परभणी, बीड जिल्ह्यात पावसाने अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने फळपिकांसह रब्बी आणि खरिपातील पिकांचेही नुकसान झाले आहे.

महसूल, कृषी विभगाला पंचनाम्याच्या सुचना

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, पैठण, पचोड या भागात अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. गोदावरी काठच्या गाव शिवारात गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची प्राथमिक पाहणी महसूलसह विभागीय कृषी अधिकाऱ्यांनी केलेली आहे. यासंदर्भात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॅा. भागवत कराड यांनी मराठवाड्यातील नुकसानीचा आढावा घेतला असून त्वरीत पंचनामे करण्याच्या सुचना कृषी विभाग आणि महसूलच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात पंचनाम्यांना सुरवात झाली नसली तरी कृषी सहाय्यक, मंडळ अधिकारी आता पुन्हा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊ लागले आहेत.

मराठवाड्यातील या पिकांना अवकाळीचा फटका

औरंगाबादसह बीड आणि नांदेड जिल्ह्यात झालेल्या गारपिटमुळे गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष, शेवगा, डाळिंब या पिकाचे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील पिकांचा पेरा होऊन केवळ महिन्यााचा कालावधी लोटलेला आहे. त्यामुळे पिके बहरात होती. शिवाय मुबलक पाणीसाठा असल्याने शेतकऱ्यांनी योग्य नियोजनही केले होते. मात्र, वातावरणातील बदल आणि आता अवकाळी, गारपिट यामुळे या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे खरिपाप्रमाणेच रब्बी हंगामातील पिक संरक्षणावर शेतकऱ्यांना अधिकचा खर्च हा करावाच लागणार आहे. खरीप पाठोपाठ रब्बी हंगामावरही कायम संकट असल्याने उत्पादनात घट होण्याची भिती आतापासून व्यक्त होत आहे.

खरीप हंगामासाठी 1 हजार 500 कोटींची नुकसानभरपाई

अतिवृ्ष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानभरपाईमध्ये केंद्र आणि राज्य सरकारचाही वाटा असतो. पंचनाम्यानंतर महसूल विभागाकडील अहवाल सादर केल्यानंतर ही नुकसान भरपाईची रक्कम अदा केली जाते. त्यानुसार राज्य सरकारने 724 कोटी तर केंद्र सरकारने 899 कोटी रुपये हे शेतकऱ्यांसाठी अदा केले होते. आता पुन्हा पंचनाम्यांना सुरवात झाली असल्याने मदतीबाबत शेतकरी आशादायी आहे.

संबंधित बातम्या :

दोन दिवस धोक्याचेच, वातावरणानुसार शेती पिकांची ‘अशी’ घ्या काळजी, कृषितज्ञांचा शेतकऱ्यांना काय सल्ला?

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे : कृषी उद्योगाचा आराखडा ते कर्ज मंजुरीपर्यंतचे प्रशिक्षण ; काय आहे कृषी विभागाचा अनोखा उपक्रम

‘पीएम किसान’ च्या दहाव्या हप्त्याचा मुहूर्त ठरला, शेतकऱ्यांचा होणार सन्मान अन् घ्यावी लागणार ही काळजी!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.