AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पीएम किसान’ च्या दहाव्या हप्त्याचा मुहूर्त ठरला, शेतकऱ्यांचा होणार सन्मान अन् घ्यावी लागणार ही काळजी!

पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या 10 व्या हप्त्याची प्रतिक्षा देशभरातील 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना होती. गेल्या अनेक दिवसांपासून हा 10 हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार याबाबत तर्क-वितर्क मांडले जात होते. अखेर तो दिवस ठरला असून शनिवारी म्हणजेच नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हा हप्ता लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे

'पीएम किसान' च्या दहाव्या हप्त्याचा मुहूर्त ठरला, शेतकऱ्यांचा होणार सन्मान अन् घ्यावी लागणार ही काळजी!
पंतप्रधान किसान सन्मान योजना
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Dec 30, 2021 | 10:21 AM
Share

मुंबई : ( Pm Kisan Samman Nidhi Yojana) पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या 10 व्या हप्त्याची प्रतिक्षा देशभरातील 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना होती. गेल्या अनेक दिवसांपासून हा 10 हप्ता कधी (Farmer) शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार याबाबत तर्क-वितर्क मांडले जात होते. अखेर तो दिवस ठरला असून शनिवारी म्हणजेच नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हा हप्ता लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. यापूर्वी 25 डिसेंबरला हा हप्ता जमा होणार असल्याची चर्चा सुरु झाली होती पण शनिवारी (Prime Minister Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांशी संवाद साधत असतानाच दुसरीकडे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा होणार आहे. त्याअनुशंगाने सर्व तयारी करण्यात आली आहे.

राज्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ

केंद्र सरकारच्या वतीने ही योजना राबवली जात असून देशभरातील 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ होत आहे. मध्यंतरी यामध्ये अनियमितता आढळून आल्याने कर भरुनही लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून ही रक्कम परत घेण्यात आली आहे. महाराष्ट्रातील 1 कोटी 5 लाख शेतकऱ्यांना या निधीचा लाभ होणार आहे. त्याअनुशंगाने 2 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी सांगितलेले आहे. तर दुसरीकडे या हप्त्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी न करता कोरोनाच्या नियमांचे पालन करावे. यासाठी बॅंकामध्ये गर्दी करु नये असेही आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांशी संवाद साधणार पंतप्रधान मोदी

शेतकऱ्यांच्या खात्यावर सन्मान निधी तर जमा होणारच आहे पण त्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरातील शेतकऱ्यांशी संवादही साधणार आहेत. मध्यंतरी गुजरात येथे पार पडलेल्या सेंद्रिय शेती कार्यक्रमादरम्यानही पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. यादरम्यान 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी त्यांचे मार्गदर्शन पाहिले असल्याचे कृषी मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते. आता गावपातळीवरील शेतकऱ्यांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे यासाठी http://pmindiawebcast.nic.in/ ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी नववर्ष आणि सन्मान निधी खात्यावर जमा होताना शेतकऱ्यांशी काय संवाद साधणार हे देखील महत्वाचे आहे.

eKYC केल्यावरच मिळणार का निधी

सन्मान निधी खात्यावर जमा होण्यास दोन दिवसांचा कालावधी असताना अनेकांना प्रश्न आहे की, eKYC ही प्रक्रिया केल्यावरच हा निधी जमा होणार का? न केल्यावर काय होणार. पण घाबरुन जाण्याचे कारण नाही. eKYC न केल्यासही हप्ता मिळणार आहे. मात्र, मार्च 2022 नंतरचे हप्ते मिळवायचे असतील तर मार्च 2022 पर्यंत ekyc करणे गरजेचे आहे. याकरिता केवळ 15 रुपये आकारले जाणार आहेत. त्यामुळे 10 वा हप्ता मिळण्यासाठी नाही पण भविष्यात ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

संबंधित बातम्या :

पीक पध्दतीमध्ये होतोय बदल, उत्तर भारतामधील राजमा मराठवाड्यात, अशी करा लागवड अन् भरघोस उत्पादन

आता पीक नुकसानीपुर्वीच निघणार तोडगा, ‘ड्रोन’ शेतीचा पहिला मान कोकणातील शेतकऱ्यांना

दुष्काळात तेरावा : डाळिंबाचे उत्पादन निम्म्याने घटले तरीही दर गडगडले, काय आहेत नेमकी कारणं?

Follow Us
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप