AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agricultural pump : वीजप्रश्न पेटला, अख्खं गाव बैल-बारदाणा घेऊन महावितरणच्या दारी

महावितरणच्या योजनेचा सर्वाधिक लाभ घेतलेल्या नांदेड जिल्ह्यातीलच एका गावाने कारभाराबद्दल रोष व्यक्त करीत थेट बैलबारदाणा, ट्रक्टर घेऊन महावितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला आहे. कृषी पंपाच्या थकबाकीपोटी प्रति पंपानुसार 20 हजार रुपये भरण्याची तयारी दर्शवूनही विद्युत पुरवठा सुरु केला जात नसल्याने शेतकऱ्यांनी ही आक्रमक भूमिका घेतलेली आहे.

Agricultural pump : वीजप्रश्न पेटला, अख्खं गाव बैल-बारदाणा घेऊन महावितरणच्या दारी
कृषीपंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता
| Edited By: | Updated on: Dec 30, 2021 | 1:53 PM
Share

नांदेड : (MSEDCL) महावितरणच्या योजनेचा सर्वाधिक लाभ घेतलेल्या (Nanded) नांदेड जिल्ह्यातीलच एका गावाने कारभाराबद्दल रोष व्यक्त करीत थेट बैलबारदाणा, ट्रक्टर घेऊन महावितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला आहे. (Agricultural pump arrears) कृषी पंपाच्या थकबाकीपोटी प्रति पंपानुसार 20 हजार रुपये भरण्याची तयारी दर्शवूनही विद्युत पुरवठा सुरु केला जात नसल्याने शेतकऱ्यांनी ही आक्रमक भूमिका घेतलेली आहे. अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथील कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडीत केल्यामुळे गुरांना पिण्यासाठी पाणी नाही तसेच पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वीज वितरण कंपनीने शेतीची विज सुरू करावी, या मागणीसाठी गावकऱ्यांनी महावितरण कार्यालयावर बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चा काढला होता.

पाण्यावाचून जनावरांचे हाल, पिकाचेही नुकसान

यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने पाणीसाठा मुबलक आहे. मात्र, पिकांना पाणी देण्याचे तर सोडाच पण विद्युत पुरवठाच खंडीत असल्याने विहिरीतील पाण्याचा उपसा करणेही शक्य होत नाही. त्यामुळे पाण्यावाचून जनावरांचे हाल होत आहे. किमान काही वेळ ठरवून विद्युत पुरवठा सुरु ठेवण्यााची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. मात्र, याकडेही दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे दोन वेळचे पाणी देणेही मुश्किल झाले आहे. दरवर्षी पाणी नसल्याने पिकांचे नुकसान होत असते तर यंदा विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने पिके करपू लागली आहेत. त्यामुळे गुरुवारी कोंढा येथील शेतकऱ्यांनी बैलगाडी, ट्रॅक्टरसह मोर्चा काढला. या मोर्चात महिला व बालकासह हजारो नागरीक सहभागी झाले होते.

महावितरणचा मनमानी कारभार

एकीकडे निम्म्या सवलतीमध्ये वीजबिल भरणा करुन घेतला जात आहे. राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही आणि महावितरणचीही वसुली होईल असा दुहेरी उद्देश ठेवत आहे. कोंढा गावातील शेतकऱ्यांनी एका कृषीपंपाच्या थकबाकीपोटी 20 हजार रुपये अदा करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, महावितरणच्या अधिकाऱ्य़ांनी सर्वच थकबाकी ते ही एकरकमी अदा करण्याचे सांगितले. त्यामुळेच संतप्त शेतकऱ्यांनी मोर्चा काढून महावितरणबाबत रोष व्यक्त केला आहे. सहाय्यक अभियंता यांनीच पैसे स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली होती.

नैसर्गिक संकटानंतर आता सुलतानी संकट

आतापर्यंत अतिवृष्टी, अवकाळी यामुळे खरिपाचे आणि आता रब्बी हंगामातील पिकांचेही नुकसान होत आहे. तर दुसरीकडे मुबलक पाणी असतानाही त्याचा उपयोग ना पिकांसाठी ना जनावरांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी होत आहे. महावितरण कंपनीकडून वसुली मोहिम सुरु आहे पण शेतकरी बिल अदा करण्याची भूमिका घेत असतानाही एकरकमीच सर्व बील अदा करुन घेण्याचा अट्टाहास का असा सवाल उपस्थित होत आहे. महावितरण वीजबिलाची सगळी थकबाकी भरण्यासाठी सांगत असल्याने शेतकरी संतप्त झाले होते.

संबंधित बातम्या :

अतिवृष्टीची नुकसनभरपाई जमा होताच अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे, काय आहे शिवारातील चित्र?

दोन दिवस धोक्याचेच, वातावरणानुसार शेती पिकांची ‘अशी’ घ्या काळजी, कृषितज्ञांचा शेतकऱ्यांना काय सल्ला?

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे : कृषी उद्योगाचा आराखडा ते कर्ज मंजुरीपर्यंतचे प्रशिक्षण ; काय आहे कृषी विभागाचा अनोखा उपक्रम

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.