भात शेतीमध्ये मत्स्यपालन करुन दुप्पट कमाईची संधी, फिश राईस फार्मिंग नेमकं काय?

| Updated on: Jun 16, 2021 | 9:45 PM

भात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना दुप्पट कमाई मिळविण्याची संधी मिळू शकते. शेतकऱ्यांना यासाठी विशेष पद्धतीने भाताची लागवड करावी लागेल.

भात शेतीमध्ये मत्स्यपालन करुन दुप्पट कमाईची संधी, फिश राईस फार्मिंग नेमकं काय?
भातशेती मत्स्यपालन
Follow us on

नवी दिल्ली: भात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना दुप्पट कमाई मिळविण्याची संधी मिळू शकते. शेतकऱ्यांना यासाठी विशेष पद्धतीने भाताची लागवड करावी लागेल. या विशिष्ट प्रकारच्या शेतीला फिश-राईस फार्मिंग असे म्हणतात. या प्रकारच्या शेतीत भातसह मासे पालनही करता येते. यामुळे शेतकऱ्यांना धानासोबत मासे विक्रीतूनही फायदा होणार आहे. खास बाब म्हणजे भात शेतात मासे वाढवल्यास त्याचे उत्पादनही चांगले मिळेल. (Fish Rice farming in India know method and all details)

अशा प्रकारची शेती कुठे होते?

सध्या चीन, बांगलादेश, मलेशिया, कोरिया, इंडोनेशिया, फिलीपिन्स, थायलंड येथे या प्रकारे भात शेती केली जाते. भारतातील काही भागात फिश-राईस शेतीच्या सहाय्याने शेतकरी दुप्पट उत्पन्न कमावत आहेत.

फिश राईस शेती कशी होते?

फिश राईस शेतीमध्ये भात पिकामध्ये साठलेल्या पाण्यातही मासे पालन केले जाते. अशा प्रकारे धान आणि मासे विक्रीतून दुप्पट उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते. शेतकरी पहिल्यांदा भाताची लागण करण्यापूर्वी फिश कल्चर तयार करू शकतात. याशिवाय शेतकरी फिश कल्चर देखील खरेदी करू शकतात. या प्रकारे शेती केल्यास मस्त्यशेतीतून चांगला फायदा होऊ शकतो. माशाचे उत्पादन, भात लागवडीच्या पध्दती, माशांची प्रजाती आणि त्यावरील व्यवस्थापनावरदेखील अवलंबून असते. या प्रकारच्या शेतीत मासे आणि भात पीक एकाच शेतात घेतलं जातं. मासे शेतीचा साधारणत: याचा तांदळाच्या उत्पादनावरही विपरित परिणाम होत नाही. एकाच शेतात एकत्रितपणे मत्स्यपालन केल्याने भात रोपांची रोगांपासून मुक्तता मिळते.

कोणती शेतजमीन गरजेची

या प्रकारच्या शेतीसाठी कमी उतार असलेली जमीन निवडली जाते. या प्रकारच्या शेतात पाणी सहजतेने जमा होते. तसेच शेताची तयारी करण्यासाठी सेंद्रिय खतावर अवलंबून राहावे. साधारणपणे मध्यम पोत असलेली गाळाची माती उत्तम मानली जाते.


संबंधित बातम्या:

जळगावच्या केळीचा जगभरात डंका, भारत केळी उत्पादनात अग्रेसर, वर्षभरात 619 कोटींची निर्यात

अमेरिकेच्या कृषी विभागाचा भारतातील राज्य सरकारसोबतचा पहिला करार महाराष्ट्राच्या कृषी मंत्रालयाशी, कराराचा नेमका फायदा काय?

(Fish Rice farming in India know method and all details)