जळगावच्या केळीचा जगभरात डंका, भारत केळी उत्पादनात अग्रेसर, वर्षभरात 619 कोटींची निर्यात

केळीच्या उत्पादनात (Banana Production) भारत अव्वल क्रमांकावर आहे.आता हळूहळू तो केळी निर्यातीमध्ये इतर देशांशी स्पर्धा करत आहे. Jalgaon banana exported to Dubai

जळगावच्या केळीचा जगभरात डंका, भारत केळी उत्पादनात अग्रेसर, वर्षभरात 619 कोटींची निर्यात
जळगाव केळी
Follow us
| Updated on: Jun 16, 2021 | 8:51 PM

जळगाव: केळीच्या उत्पादनात (Banana Production) भारत अव्वल क्रमांकावर आहे.आता हळूहळू तो केळी निर्यातीमध्ये इतर देशांशी स्पर्धा करत आहे. भारताकडून भौगोलिक सांकेतांक (जीआय टॅग) प्रमाणित कृषी उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यात येत आहे. भारतीय केळी फायबर आणि खनिजांनी समृद्ध आहेत. महाराष्ट्रातील जळगाव केळीची दुबईमध्ये निर्यात करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील तांदुळवाडी गावच्या प्रगतीशील शेतकऱ्यांकडून 22 मेट्रीक टन जीआय टॅग प्रमाणित जळगाव केळी निर्यात करण्यात आली आहेत. (Jalgaon banana GI certified produced by Tandulwadi Farmers exported to Dubai)

जळगाव केळीला 2016 मध्ये जीआय टॅग

जळगाव केळीला 2016 मध्ये जीआय प्रमाणपत्र मिळाले, जे निसारगर्ज कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) जळगाव येथे नोंदवले गेले आहे. जागतिक स्तरावरील कृषी पद्धती आणि नियमांचा वापर केल्यामुळे भारतातील केळीची निर्यात वेगाने वाढत आहे.

भारताची केळी निर्यात वाढली

भारताच्या केळी निर्यातीचं प्रमाण आणि मूल्य गेल्या काही दिवसांमध्ये वाढलं आहे. 2018-19 मध्ये 1.34 लाख मेट्रिक टन केळी निर्यात झाली. ज्याची किंमत 413 कोटी रुपये होती. 2019-20 मध्ये 660 कोटी रुपयांची निर्यात करण्यात आली. त्यावर्षी 1.95 लाख मेट्रिक टन केळी निर्यात झाली . 2020-21 (एप्रिल 2020-फेब्रुवारी 2021) मध्ये भारताने 619 कोटी रुपयांच्या 1.91 लाख टन केळीची निर्यात केली आहे.

सर्वात मोठा केळी उत्पादक

भारत जगात केळीचा सर्वात मोठे उत्पादक आहे. जगातील एकूण केळी उत्पादनापैकी सुमारे 25 टक्के उत्पादन भारतात होते. देशातील केळी उत्पादनात आंध्र प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, महाराष्ट्र, केरळ, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये 70 टक्क्यांहून अधिक उत्पादन होते.

कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (आपेडा) शेती माल निर्यातीसाठी मदत करते. निर्यातदारांना त्यांच्या योजनेच्या पायाभूत सुविधा, गुणवत्ता विकास आणि बाजारपेठ विकास या घटकांच्या अंतर्गत सहाय्य करुन कृषी व प्रक्रिया केलेल्या खाद्य उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्याचं काम आपेडा करुन केलं जातं. आपेडा आंतरराष्ट्रीय खरेदीदार-विक्रेत्यांच्या बैठका, शेती आणि प्रक्रिया केलेल्या खाद्य उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आयात देशांसह ऑनलाईन व्यापार मेळावे देखील आयोजित करते.

भारतात केळी सर्व हंगामात उपलब्ध असते. केळी बरेच पौष्टिक पदार्थ आढळत असल्यानं केळीची मागणी बाजारात कायम असते. केळीचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात केले जाते. याशिवाय कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, गुजरात आणि आसाममध्येही केळीची बरीच निर्मिती केली जाते.

संबंधित बातम्या

अमेरिकेच्या कृषी विभागाचा भारतातील राज्य सरकारसोबतचा पहिला करार महाराष्ट्राच्या कृषी मंत्रालयाशी, कराराचा नेमका फायदा काय?

ऊसाला गाजर दाखवलं!, पारंपारिक शेतीला फाटा, गाजराच्या शेतीतून भरघोस नफा, गावाचा जिल्ह्यात गाजावाजा

Jalgaon banana GI certified produced by Tandulwadi Farmers exported to Dubai

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.