Onion Market : उन्हाळी कांद्याचे उत्पादनही घटले अन् दरही, शेतकऱ्यांसमोर आता एकच पर्याय..!

| Updated on: Apr 08, 2022 | 3:50 PM

उन्हाळी हंगामात उत्पादन वाढीच्या अनुशंगाने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक पध्दतीमध्ये बदल केला होता. हंगामाच्या सुरवातीला सर्वकाही सुरळीत होते. शिवाय मुबलक पाणीसाठ्यामुळे उत्पादनात वाढ होईल असा आशावाद व्यक्त केला जात होता. विशेषत:जिल्ह्यातील कामसादे परिसरात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड ही दरवर्षी केली जाते. पण अवकाळी पावसाने उत्पादन घटले अन् बाजारात मागणी नसल्याने दर घटले आता अशा अवस्थेत शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याच्या साठवणूकीवर भर दिला आहे.

Onion Market : उन्हाळी कांद्याचे उत्पादनही घटले अन् दरही, शेतकऱ्यांसमोर आता एकच पर्याय..!
उन्हाळी हंगामातील कांद्याची साठवणूक केली जात आहे.
Follow us on

नाशिक :  (Summer Season) उन्हाळी हंगामात उत्पादन वाढीच्या अनुशंगाने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक पध्दतीमध्ये बदल केला होता. हंगामाच्या सुरवातीला सर्वकाही सुरळीत होते. शिवाय मुबलक पाणीसाठ्यामुळे उत्पादनात वाढ होईल असा आशावाद व्यक्त केला जात होता. विशेषत: (Nashik) जिल्ह्यातील कामसादे परिसरात मोठ्या प्रमाणात (Onion Crop) कांद्याची लागवड ही दरवर्षी केली जाते. पण अवकाळी पावसाने उत्पादन घटले अन् बाजारात मागणी नसल्याने दर घटले आता अशा अवस्थेत शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याच्या साठवणूकीवर भर दिला आहे. नाशिक जिल्ह्यात ज्याप्रमाणे कांदा उत्पादन घेतले जाते त्याचप्रमाणे कांदा साठवणूकीसाठी कांदा चाळही उभारली जाते. त्याचाच आता उपयोग करुन भविष्यात दर वाढल्यावर कांद्याची विक्री केली जाणार आहे.

कांद्याच्या दरात कमालीची घट

कांदा दरातील लहरीपणाचा अधिकतर फटका हा शेतकऱ्यांनाच बसलेला आहे. यावेळी ऐन उन्हाळी हंगामातील कांदा मार्केटमध्ये दाखल होत असतानाच दरात घसरण होण्यास सुरवात झाली होती. फेब्रुवारीमध्ये कांद्याला प्रति क्विंटल 3 हजार ते 3 हजार 500 पर्यंत दर मिळत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी रात्रीचा दिवस करीत कांदा छाटणी करुन विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल केला मात्र, आवक वाढताच दर घसरले आहे. 3 हजार 500 वरचा कांदा थेट 800 ते 900 रुपये क्विंटलवर येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे शेतकरी आता विक्रीची गडबड न करता सरळ साठवणूकीवर लक्ष केंद्रीत करीत आहे. नाशिक जिल्ह्यातच कांदा चाळ मोठ्या प्रमाणात आहेत. इतर भागातील शेतकऱ्यांना कांदा विक्री शिवाय पर्यायच नाही.

विक्रमी क्षेत्रात लागवड असतानाही घटले उत्पादन

खरिपातील कांद्याचे अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे नुकसान झाले होते. त्यामुळे लाल कांद्याला विक्रमी दर मिळाला होता. खरिपात झालेले नुकसान उन्हाळी हंगामात भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी कांदा लागवडीवर भर दिला होता. पण खरिपाप्रमाणेच रब्बी हंगामातही अवकाळीची अवकृपा राहिल्याने कांदा उत्पादनात घट झाली आहे. असे असाताना मागणी नसल्याने कांद्याचे दर कमी झाले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकरी थेट कांदा सावठवणूकीवर भर देत आहे. भविष्यात दर वाढताच विक्री हे धोरण शेतकऱ्यांनी ठरवले आहे.

कांद्याची साठवणूक का गरजेची आहे.

काद्याची योग्य प्रकारे साठवण न केल्यास 45-60 टक्क्यांपर्यंत त्याचे नुकसान होऊ शकते. हे नुकसान प्रामुख्याने वजनातील घट, कांद्याची सड व कोंब येणे इ. कारणांमुळे होते. त्यामुळे कांद्याचे कमीत कमी नुकसान होण्यासाठी कांद्याची योग्य पध्दतीने साठवणूक होणे गरजेचे आहे. कांद्याची शास्त्रोक्त पध्दतीने साठवण केल्यास पूर्णपणे नुकसान टळेल असे नाही पण15 ते 20 टक्क्यांपर्यंत नुकसान टळेल हे नक्की. कारण कांदाचाळीत 4-5 महिन्यापर्यंत कांदा सुस्थितीत राहू शकतो. त्यामुळे होणारे नुकसान टाळून शेतक-याला आर्थिक फायदा वाढविता येऊ शकतो.

संबंधित बातम्या:

Nandurbar Market: युध्द रशिया-युक्रेन युध्दाचा फायदा धुळ्याच्या शेतकऱ्याला, 973 च्या वाणाच्या गव्हाला विक्रमी दर

Agricultural Department: खरिपाचे नियोजन कागदावर नव्हे तर शेतीच्या बांधावर, कृषी विभागाच्या आराखड्यात दडलंय काय?

Hapus Mango : फळांचा राजा ‘ऑनलाईन’द्वारेही मिळणार, रत्नागिरीत अनोख्या उपक्रमाला दणक्यात सुरवात