अतिवृष्टीत जोपासली पण अवकाळीनंतर बुडापासूनच वाळले तुरीचे पीक, कसे करावे व्यवस्थापन?

| Updated on: Dec 11, 2021 | 1:40 PM

हंगामातील मुख्य पिक असलेल्या सोयाबीनचे नुकसान हे अतिवृष्टीमुळे तर आता अवकाळीमुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल वातावरणाचा परिणाम तूर पिकावर होत आहे. ऐन शेंगा पोसण्याच्या अवस्थेत तूर असतानाच मर रोगाचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. त्यामुळे तुरीच्या पिकाचा बुडापासूनच खराटा होत असल्याचे चित्र केवळ मराठवाड्यातच नाही तर ज्या ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे त्या क्षेत्रावर आहे.

अतिवृष्टीत जोपासली पण अवकाळीनंतर बुडापासूनच वाळले तुरीचे पीक, कसे करावे व्यवस्थापन?
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : (kharif season) खरीप हंगाम अंतिम आला तरी निसर्गाची अवकृपा कायमच राहिलेली आहे. हंगामातील मुख्य पिक असलेल्या सोयाबीनचे नुकसान हे अतिवृष्टीमुळे तर आता अवकाळीमुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल वातावरणाचा परिणाम (Toor crop) तूर पिकावर होत आहे. ऐन शेंगा पोसण्याच्या अवस्थेत तूर असतानाच (pest infestation) मर रोगाचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. त्यामुळे तुरीच्या पिकाचा बुडापासूनच खराटा होत असल्याचे चित्र केवळ मराठवाड्यातच नाही तर ज्या ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे त्या क्षेत्रावर आहे. यामुळे (farmers, decline in production) उत्पादनात तर घट झालीच आहे पण खराटा झालेल्या झाडाच्या शेंगा काढाव्यात तरी कशा असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे.

पाऊस अन् ढगाळ वातावरणाचा परिणाम

वातावरणातील बदलाचा परिणाम हा खरीप हंगामातील सर्वच पिकांवर झालेला आहे. मध्यंतरी अतिवृष्टीतून कापूस आणि तुरीची सुटका झाली होती पण आता ढगाळ वातावरणाचा परिणाम या पिकांवर झालेला आहे. मर रोगामुळे तूर ही बुडापासूनच वाळत आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदाही पिकावर या रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. अधिकच्या खर्चामुळे याचे नियंत्रण तरी करावे कसे असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे. शेंगा पोसण्याच्या आगोदरच झाडच वाळून जात आहे. त्यामुळे दाण्यांचा आकार लहान झाला असून त्याचा उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. पाने, शेंगा वाळून गेल्याने आता केवळ तुऱ्हाट्या उभ्या दिसत आहेत.

असे करा व्यवस्थापन

मर रोग हा बुरशीजन्य रोग आहे. यामुळे तुरीच्या खोडावर ठिपके, भेगा पडून झाडाच्या मुळाकडे अन्नद्रव्याचा पुरवठाच होऊ दिला जात नाही. त्यामुळे तुर ही मुळापासूनच वाळायला सुरवात होते. दरवर्षी अंतिम टप्प्यात पिक असताना या मर रोगाचा प्रादुर्भाव हा ठरलेलाच आहे. त्यामुळे वर्षभर केलेली मेहनतही वाया जाते आणि अपेक्षित उत्पादनही मिळत नाही. वातावरणातील बदलाचा हा परिणाम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फुलोऱ्यात असलेल्या तुरीला प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मेटॅलॅक्झिल अधिक मॅन्कोझेब हे संयुक्त बुरशीनाशक प्रति 1 लिटर पाण्यात 1 ग्रॅम याप्रमाणे मिसळून फवारणे गरजेचे आहे. शिवाय वातावरण स्वच्छ असतानाच याची फवारणी फायदेशीर राहणार आहे.

आता काढणी देखील मुश्किल

खरीप हंगामात तूर हे आंतरपिक म्हणून घेतले जात असले तरी उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचे पिक आहे. शिवाय हंगामातील सर्वात शेवटचे पिक आहे. आता कापूस अंतिम टप्प्यात असला तरी मात्र, तूर हे शेंग पोसण्याच्या अवस्थेत आहे. मात्र, अवकाळी पावसानंतर निर्माण झालेल्या वातावरणामुळे या पिकावर किडीचा आणि रोगराईचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. त्यामुळे तुरीचे पिक हे संपूर्ण वाळून गेले असून उभ्या पिकाचाच खराटा झाला आहे. आता काढणी कामेही मुश्किल होत आहे. आतापर्यंत पीक जोपासण्यासाठी झालेला खर्च तरी उत्पादनातून निघणार का नाही हा प्रश्न आहे.

संबंधित बातम्या :

Sugar Factories : शेवटी ऊसतोड मजुरच आले कामी, पावसाने यंत्रांची चाके रुतलेलीच

कांद्याने केला वांदा : 2 एकरातील कांदा पिकात सोडली जनावरे, अतोनात खर्च अन् हतबल शेतकरी

प्रत्येक बाजार समितीने अनुकरण करावे असा लातूर स्टेशनच्या ‘कृऊबा’ चा उपक्रम, शेतकऱ्यांनाही फायदा