ऊस उत्पादनाचे काय आहे गणित ? लागवडीपासून तोडणीपर्यंतची अशी घ्या काळजी अन् मिळवा भरघोस उत्पादन

| Updated on: Nov 08, 2021 | 4:28 PM

केवळ सिंचनाची सोय आहे आणि नगदी पिक म्हणूनच लागवडीवर अमाप खर्च न करता योग्य नियोजन केले तर कमी क्षेत्रात अधिकचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार आहे. याकरिता शेतकरी डॅा. अंकुश चोरमोले यांनी ऊस उत्पादकांना मोलाचा सल्ला दिला आहे. लहान-सहान बाबींची कशी काळजी घ्यावयाची, उत्पादन वाढीसाठी नेमके काय करायचे याबाबत त्यांनी केलेले मार्गदर्शन अनेक शेतकऱ्यांना उपयोगी ठरणार आहे.

ऊस उत्पादनाचे काय आहे गणित ? लागवडीपासून तोडणीपर्यंतची अशी घ्या काळजी अन् मिळवा भरघोस उत्पादन
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : ऊस हे सर्वात मोठे नगदी पिक आहे. शिवाय सिंचनाची सोय आणि लागवडी योग्य जमिन तयार करुन घेतली जात असल्याने ऊसाचे क्षेत्र हे दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, (Sugarcane cultivation) ऊसाच्या क्षेत्राबरोबरच त्याचे एकरी उत्पादनही वाढणे गरजेचे आहे. केवळ (irrigation facility) सिंचनाची सोय आहे आणि नगदी पिक म्हणूनच लागवडीवर अमाप खर्च न करता योग्य नियोजन केले तर कमी क्षेत्रात अधिकचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार आहे. याकरिता शेतकरी (Dr. Ashok Chormole) डॅा. अंकुश चोरमोले यांनी ऊस उत्पादकांना मोलाचा सल्ला दिला आहे. लहान-सहान बाबींची कशी काळजी घ्यावयाची, उत्पादन वाढीसाठी नेमके काय करायचे याबाबत त्यांनी केलेले मार्गदर्शन अनेक शेतकऱ्यांना उपयोगी ठरणार आहे.

यंदाचा ऊस गळीत हंगाम सुरु झाला आहे दुसरीकडे सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने ऊसाचे क्षेत्र हे वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे रब्बी हंगामात पेरण्या कमी झाल्या असून शेतकऱ्यांचा कल हा ऊस लागवडीकडेच राहणार आहे. त्यामुळे तुम्ही जर ऊस लागवडीचा विचार करीत असताल तर ही माहीती आवश्य घ्या. जेणेकरुन तुमच्या उत्पादनात वाढ होणार आहे.

जे शेतकरी नव्याने ऊस लागवड करीत आहेत त्यांच्यासाठी महत्वाचा सल्ला राहणार आहे. डॉ अंकुश चोरमुले हे मुळचे सांगलीचे असून त्यांनी राहुरी कृषी विद्यापीठातून डॅाक्टरेट पदवी मिळवलेली आहे. त्यांनी ऊसाचे उत्पादन वाढवण्यासाठी काय केले प्रयोग हे शेतकऱ्यांसमोर मांडले आहेत. त्यामुळे उत्पादन वाढीस मदत होणार आहे.

ऊस लागवडीचे असे करा नियोजन

अधिकच्या उत्पादनासाठी अधिकची लागवड हा पर्याय नसून योग्य लागवड हाच पर्याय आहे. मात्र, शेतकरी केवळ उत्पादन डोळ्यासमोर ठेऊन ऊसाची लागवड दाट करतात. तर एकरी 80 ते 100 टन उत्पादन घ्यावयाचे असेल तर रोप लावताना सरीतली माती व्यवस्थित काढून रोप लावून पुन्हा ते रोप दोन्हा पायामध्ये धरुन मातीत दाबीन ते झाकायचे आहे. अन्यथा त्याला फुटवे होणार नाहीत त्यामुळे मोठे नुकसान होते. तर ही लागवड 5 बाय दीड फूटावर करणे आवश्यक आहे. म्हणजे दोन्ही रोपात दीड फूट तर सरीतले अंतर हे 5 फूट असावे. एकरी 40 हजार ऊस ठेवले आणि अंतर हे वरी दिल्याप्रमाणे ठेवले तर 80 ते 100 टन ऊस हा होतोच.

लावडीनंतर अशी घ्या काळजी

लागवडीपासून 4 ते 5 महिने खूप महत्वाचे आहेत. लागवडीच्या 40 ते 50 दिवसानंतर मदर शूट म्हणजे जेठा काढावा जेणेकरुन सगळ्या ऊसाची समान वाढ होते. तर जेठा काढताना तो मोडूनच काढला पाहिजे. हाताचा हिसका देऊन तो बाजूलाच करावा लागतो अन्यथा पुन्हा त्याची वाढ होते. कोंभ हातामध्ये पकडून हिसडा दिला की जेठा हा रोपापासून दूर होतो.

खताचे व्यवस्थापन

ऊस लागवडीनंतर खत फेकण्याची परंपरा आहे. मात्र, त्यामुळे फायदा नाही तर नुकसानच होते. त्यामुळे रोपाच्या बुडाला कुदळीच्या सहायाने गर करुन घ्या आणि त्यामध्ये खत टाका किंवा खत टाकले की त्यामागे कुळवण चालू ठेवा त्यामुळे खत हे मातीच्या आड तर होतेच पण ऊसाला त्याचा अधिकचा फायदा होतो. अशापध्दतीने दोन ते तीन डोस द्यावे लागतात. नंतर मात्र मशागतीमुळे आपोआपच खत हे ऊसाच्या बुडाला जाते. याचा अनुकूल परिणाम हा उत्पादनावर होणार आहे.

पाण्याचे नियोजन

ऊस शेतीला भरपूर पाण्याची नाही तर योग्य पाण्याच्या नियोजनाची आवश्यकता आहे. अमाप पाणी सोडले तर जमिनीचा कस हा निघून जातो. पाच बाय अडीच याप्रमाणे लागवड केली असेल तर 9 इंच ते 1 फूटार्यंत जरी ते भिजले तरी उत्पादन हे वाढणारच आहे. लागवडीनंतरचे चार ते पाच महिने हे महत्वाचे असतात. यामध्ये पिकांची वाढ, फुटव्यांची जाडी, पानाची रुंदी याकरिता काही फवारण्या ह्या कराव्या लागणार आहेत.

ऊसाचे पाचट काढणे

तोडणीच्या काही काळ आगोदर ऊसाचे पाचट हे काढावे लागते. ते ऊसाच्या जातीवरुन कसं काढायचे ते ठरतं. यामध्ये 265, 10001, 8005 या वाणाचे बिणे असेल आणि तुम्ही जर पाचट काढले तर ऊसाला कोंभ फुटण्याची समस्या निर्माण होते. अशा शेतामधला केवळ ऊसाच्या बुडाचा पाला काढून घेणेच महत्वाचे आहे. 86:0:32 या जातीच्या ऊसाचे पाचट काढले तर कोंभ सर्व निघणार आहेत. शिवाय पाहिजे तेवढी ऊसाची संख्या ठेवता येणार आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ होणार आहे.

संबंधित बातम्या :

रात्रीची थंडी, दिवसा ढगाळ वातावरण, तूरीवर मारुका किडीचा प्रादुर्भाव, काय आहे उपाययोजना?

पुन्हा धाकधूक..! बाजार समित्या सुरु होताच सोयाबीनचे दर…

पांढऱ्या कापसाला ‘सोन्या’चा भाव, तोडणीसाठी मात्र मजूरांचा आभाव