रात्रीची थंडी, दिवसा ढगाळ वातावरण, तूरीवर मारुका किडीचा प्रादुर्भाव, काय आहे उपाययोजना?

गेल्या आठ दिवसातील वातावरण बदलाचा सर्वाधिक परिणाम हा तूरीवर होऊ लागला आहे. रात्री थंडी आणि दिवसा ढगाळ वातावरण यामुळे तूरीवर ((Maruca vetrata)) मारुका किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या शेंग पोसण्याच्या अवस्थेत हे पीक असून मारुका या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे उत्पादनावर त्याचा परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यांनी वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे.

रात्रीची थंडी, दिवसा ढगाळ वातावरण, तूरीवर मारुका किडीचा प्रादुर्भाव, काय आहे उपाययोजना?
संग्रहीत छायाचित्र

लातूर : मध्यंतरीच्या अतिवृष्टीचा परिणाम तूर उत्पादनावर झाला नाही. त्यामुळे मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात तूर ही जोमात आहे. मात्र, गेल्या आठ दिवसातील (Change in environment) वातावरण बदलाचा सर्वाधिक परिणाम हा तूरीवर होऊ लागला आहे. रात्री थंडी आणि दिवसा ढगाळ वातावरण यामुळे तूरीवर ((Maruca vetrata)) मारुका किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. (pest infestation on turi) सध्या शेंग पोसण्याच्या अवस्थेत हे पीक असून मारुका या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे उत्पादनावर त्याचा परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यांनी वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे.

अतिवृष्टीचा परिणाम हा सोयाबीनसह इतर पिकावर झाला असला तरी तूरीची जोमात वाढ झाली होती. मात्र, पावसाने नाही पण सध्याच्या वातावरणातील बदलाचा परिणाम पिकावर दिसून येत आहे. या मारुका अळीमुळे फुलावस्थेत असलेल्या तुरीची नासाडी होते. थेट शेंगाच खात असल्याने उत्पादनात घट होण्याचा धोका आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील वातावरणात बदल झाल्याने कृषी विभागाने मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी गरजेची आहे.

पिकाची पाहणी करा अन् मारुकाचा प्रादुर्भाव ओळखा

मारुका ही कडधान्य पिकावरील पाने गुंडाळणारी व शेंगा पोखरणारी कीड आहे. या किडीचा पतंग करडया रंगाचा असून मागील पंखावर पांढरे पट्टे आढळून येतात. मादी पतंग कळ्या, फुले व शेंगावर अंडी घालतात. अळी पांढुरक्या रंगाची व अर्धपारदर्शक असते. तिच्या पाठीवर काळ्या रंगाच्या सहा ठिपक्यांच्या जोड्या असतात. अंड्यातून निघालेली अळी कळ्या, फुले व शेंगांना एकत्रित करून जाळ्याने चिटकून झुपके तयार करते किंवा आतमध्येच राहून कळ्या, फुले खाते. तिसऱ्या व चौथ्या अवस्थेतील अळी शेंगा पोखरून आतील दाणे खाते. अळी शेंगांच्या झुपक्यात किंवा माती मध्ये कोषावस्थेत जाते. या किडीचा जीवनक्रम 18 ते 35 दिवसात पूर्ण होतो.

असे करा व्यवस्थापन, अन्यथा उत्पादनात घट

मारुका अळीच्या व्यवस्थापनासाठी जिथे तूर पीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. तेथे सर्वेक्षण करून शेतात 20 ते 25 ठिकाणी प्रती मीटर ओळीच्या अंतरात दिसून आल्यास किटकनाशकांची फवारणी करावी लागणार आहे. * फ्लूबेंडामाइड 20 डब्ल्यूजी 6 ग्रॅम किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्यू.पी 20 ग्रॅम किंवा नोवलुरोन 5.25 इंडोक्झाकार्ब 4.50 एससी 16 मिली यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ही फवारणी पॉवरस्प्रेने फवारणी करावी. दुसरऱ्या फवारणीच्या वेळेस कीटकनाशकाची मात्रा ही तिप्पट करावी. गरज भासल्यास पुन्हा 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी. दुसऱ्या फवारणीच्या वेळेस कीटकनाशकांची अदलाबदल करावी. उपरोक्त किटकनाशकांसोबत इतर कीटकणशके, बुरशीनाशके, संप्रेरके, खते, अन्नद्रव्ये इत्यादी मिसळू नये.

शेतकऱ्यांनी सुरक्षा कीटचा वापर करावा

आजही शेतकरी हे सुरक्षित कीटचा वापर न करताच शेतातील कामे करीत आहेत. विशेष: कीटकनाशकाची फवारणी करीत असाताना सुऱक्षा कीटचा वापर हा महत्वाचा आहे. अनेक ठिकाणी केवळ सुरक्षा कीटचा वापर न केल्याने शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला होता. पण आता अत्याधुनिक स्प्रे आले आहेत शिवाय सुरक्षतेची साधनेही वाढली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा सुरक्षित कीटचा वापर करण्याचे अवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

पुन्हा धाकधूक..! बाजार समित्या सुरु होताच सोयाबीनचे दर…

पांढऱ्या कापसाला ‘सोन्या’चा भाव, तोडणीसाठी मात्र मजूरांचा आभाव

‘झामा’ ची सेंद्रिय शेती, शेतकऱ्यांना फायदा अन् ग्राहकांना दर्जेदार अन्न पुरवठा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI