AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar Health Update: शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर, डॉक्टरांनी दिली अशी अपडेट

Sharad Pawar Health Updates: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नेतके शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. अद्यापही शरद पवार रुग्णालयात आहेत... तर जाणून घ्या कायम म्हणाले डॉक्टर?

Sharad Pawar Health Update: शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर, डॉक्टरांनी दिली अशी अपडेट
| Updated on: Feb 14, 2026 | 12:24 PM
Share

Sharad Pawar Health Updates: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नेत शरद पवार (Sharad Pawar) यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. खुद्द डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट दिली आहे. शरद पवार यांची प्रकृती आता उत्तम आहे. आता शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शरद पवारांची प्रकृती आता व्यवस्थित असल्याने शरद पवार यांना डिस्चार्ज मिळाला आहे.

रुबी हॉल क्लिनिकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पुरवेझ ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवारांना आज देण्यात डिस्चार्ज आला आहे. शरद पवारांना पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. शरद पवार यांची प्रकृती उत्तम आहे आणि ते बरे झाले असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे.

काय म्हणाले डॉ परवेझ ग्रँट?

शरद पवार यांच्या प्रकृतीची अपडेट देत डॉ परवेझ ग्रँट म्हणाले, आज आम्हाला आनंद झाला आहे… पवार साहेब यांची तब्येत चांगली आहे ते आज घरी जाणार आहेत… छोटसं छातीचं इन्फेक्शन झालं होतं… एक तासाने शरद पवार यांना रुबी हॉल क्लिनिक मधून सोडण्यात येणार… घरी जाऊन आराम करतील… चार-पाच दिवस घरीच आराम करतील पुण्यामध्ये नंतर बाहेर जाऊ शकता…. शरद पवार पूर्ण चांगले झाले आहेत…

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना छातीत संसर्ग झाल्यामुळे पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर शरद पवार यांच्या विविध वैद्यकिय चाचण्या करण्यात आल्या… रिपोर्ट आल्यानंतर काळजी करण्याचं काहीही कारण नाही.. असं देखील डॉक्टरांना सांगितलं.

सांगायचं झालं तर, शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी एक ट्विट करत प्रकृतीबद्दल अपडेट कळवली होती. एक पोस्ट करत सुप्रिया सुळे म्हणालेल्या, बाबांना छातीत संसर्ग झाला असून त्यांना 5 दिवसांच्या अँटीबायोटिक्सचा कोर्स (Antibiotics Course) पूर्ण करावा लागणार आहे. सुदैवाने, इतर सर्व शारीरिक रिपोर्ट्स सामान्य आले आहेत. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दल मी मनापासून आभारी आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची तब्येत बरी नसल्याचे समोर येत होतं. मात्र 9 फेब्रुवारी रोजी त्यांना जास्त त्रास झालेला आहे. त्यांना ताप, खोकला आणि कफ असल्याचे सांगण्यात आलं होतं. आता शरद पवार यांची प्रकृीत उत्तम असून, त्यांना शनिवारी डिस्चार्ज मिळाला आहे.

Follow Us
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर