AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर

दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर

| Updated on: Sep 27, 2026 | 11:48 AM
Share

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुष्काळामुळे साध्या पद्धतीने विवाह सोहळे करण्याचे आवाहन केले आहे. यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. सामान्य माणूस नेहमीच साधेपणाने जगतो, तर पैशाचा माज दाखवणारे सम्राट लोक आहेत. श्रीमंत घराण्यांनी स्वतःपासून सुरुवात करावी, असे राऊत यांनी म्हटले आहे.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना साध्या पद्धतीने विवाह सोहळे करण्याचे आवाहन केले आहे. मोठेपणा दाखवणे यावर्षी तरी थांबवावे अशी विनंती त्यांनी केली. कोविड काळातही ५०-२५ लोकांमध्ये लग्न झाल्याचे आणि त्यामुळे काही अडले नाही, हे त्यांनी नमूद केले. दुधातील भेसळ थांबल्याने त्याचे भाव वाढले, कारण ३० टक्के दूध कमी झाले आणि मागणी वाढली, हे उदाहरणही त्यांनी दिले. या आवाहनावर बोलताना खासदार संजय राऊत यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

दुष्काळात साधेपणाने लग्न करण्याच्या सूचना चांगल्या असल्या तरी, श्रीमंत घराण्यांनी याकडे लक्ष द्यावे असे राऊत म्हणाले. सामान्य माणूस, शेतकरी, कष्टकरी आणि कामगार कायमच साधेपणाने व्यवहार करतात. पैशाचा माज सम्राट लोक दाखवतात, सामान्य माणूस नाही. त्यामुळे विखे पाटलांसारख्या श्रीमंत व्यक्तींनी स्वतःपासून चिंतन करावे, असे प्रतिउत्तर संजय राऊत यांनी दिले. त्यांनी त्यांच्या मुलांकडे आधी पहावे असेही राऊत यांनी सुचवले.

Published on: Sep 27, 2026 11:48 AM

Follow Us