AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शौचालयातल्या उग्र वासामुळे दोन तरुणांचा मृत्यू, मुंबईतील धक्कादायक घटना

शौचालयातल्या उग्र वासामुळे दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईत घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. तर जाणून घ्या नेमकं काय झालं आहे.

शौचालयातल्या उग्र वासामुळे दोन तरुणांचा मृत्यू, मुंबईतील धक्कादायक घटना
| Updated on: Sep 27, 2026 | 2:10 PM
Share

मुंबईतील गोरेगाव पूर्व भागातील राम मंदिर परिसरातील एका सार्वजनिक शौचालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामुळे दोघांना स्वतःचे प्राण गमवावे लागले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, शौचालयात गेलेल्या केमिकलच्या उग्र वासामुळे दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही भयानक घटना पारसी पंचायत गेट समोर, मृणालताई ब्रिजजवळ घडली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, 27 सप्टेंबर सकाळी साडेआठ वाजता सार्वजनिक शौचालयात केमिकलच्या वासाने दोघांना श्वास गुदमरल्याची माहिती मिळाली होती. घटनोची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. अशात दोघांनी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोघांना बेशुद्ध अवस्थेत ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री 12 दोघांना ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोघांवर देखली उापचार सुरु होते. पण उपचारादरम्यानच दोघांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे 3 वाजून 49 मिनिटांनी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

शौचालयात येत असलेल्या उग्र वासामुळे ज्या दोघांनी आपले प्राण गमावले त्यांची नावे देखील समोर आली आहे. मृतांची ओळख 24 वर्षीय प्रभाकर धनिवार आणि 18 वर्षीय भावीन देसाई अशी झाली आहे. प्राथमिक तपासानंतर दम लागून मृत्यू झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, 108 रुग्णवाहिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि बीएमसीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. आता शौचालयात केमिकलचा वास कुठून आला आणि दोन्ही तरुणांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा पोलिसांचा कसून तपास सुरू आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अब्दुल शेख यांनी सांगितल्यानुसार,  राम मंदिर येथे शिवशंकर चाळ, चाळीच्या आत बाथरूम / संडास आहे. गणेशोत्सव मंडळाचे 8 ते 9 कार्यकर्ते जेवायला गेले होते, जेवून आले आणि बसले होते. त्यानंतर भाविक आणि प्रभाकर हे दोन मुले संडासला गेले, आतमध्ये चक्कर आली आणि आतच पडले. बाकीच्या कार्यकर्त्यांना अर्धा तास झाला तरी आले नाहीत म्हणून लक्षात आले, जाऊन पाहिले तर दरवाजा बंद होता, अखेर त्यांना दरवाजा तोडून बाहेर काढलं.

समोर येत असलेल्या माहितीनुसार, या संडासच्या बाजूला घरगुती छोटा कारखाना आहे, त्यामध्ये काही केमिकल वापरलं जात होतं. मिळालेल्या माहितीनुसार कारखान्यातील लोक केमिकल ड्रेनेजमध्ये टाकतात आणि ड्रेनेज लाईन व संडासची लाईन बाजू-बाजूला आहे, हे केमिकल घातक आहे. सध्या बॉडीचा ऑन कॅमेरा पोस्टमॉर्टम सुरू आहे, कायदेशीर कारवाई सुरू असून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करणार.

घडलेल्या या घटनेनंतर दोन्ही तरुणांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, शौचालय सार्वजनिक असला तरी, स्वच्छता फार गरजेची आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून तो संपूर्ण परिसर आणि शौचालय तात्काळ सील करण्यात आले आहे. अशात, केमिकल लीक नेमका कसा झाला आणि त्यामागे कोणाचा निष्काळजीपणा आहे का, याचा सखोल तपास पोलीस करत आहे… तर याप्रकरणी पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!
राष्ट्रवादीत फूट पडणार? दादांच्या गटातील 22 आमदार कधीही... -संजय राऊत
राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार? दादांच्या गटाचे 22 आमदार कधीही... संजय राऊतांचं मोठं विधान