तयारी रब्बीची : ‘पेरलं की उगवंतच पण योग्य पेरंल की उत्पादनही वाढतं’

| Updated on: Oct 21, 2021 | 12:24 PM

खरीपात पावसाने नुकसान झाले असले तरी रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. याचाच फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य पध्दतीने पेरणी केली तर उत्पादनात वाढ होणार आहे. खरीप पिकांची काढणी कामे संपुष्टात आली असून रब्बीची लगबग ही सुरु झाली आहे. बळीराजा पुन्हा जोमाने कामाला लागलेल्याचे चित्र मराठवाड्यात आहे. पुर्वमशागत करुन आता शेतकरी चाढ्यावर मूठ ठेवणार आहे.

तयारी रब्बीची : पेरलं की उगवंतच पण योग्य पेरंल की उत्पादनही वाढतं
शेती मशागत
Follow us on

राजेंद्र खराडे : लातूर : ‘जसं पेरल तसं उगवेल’ अशी म्हण ही प्रचलित आहे. पण शेती (Increase in production) उत्पादनात वाढ करायची असेल तर आता म्हणीमध्ये जरा बदल करणे आवश्यक आहे. कारण खरीपात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीपात पावसाने नुकसान झाले असले तरी (Rabbi Season) रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. याचाच फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य पध्दतीने पेरणी केली तर उत्पादनात वाढ होणार आहे. खरीप पिकांची काढणी कामे संपुष्टात आली असून रब्बीची लगबग ही सुरु झाली आहे. बळीराजा पुन्हा जोमाने कामाला लागलेल्याचे चित्र मराठवाड्यात (Marathwada) आहे. पुर्वमशागत करुन आता शेतकरी चाढ्यावर मूठ ठेवणार आहे. पण पेरणी पध्दतीमध्ये नेमका काय बदल आणि काय काळजी घ्यावयाची हे महत्वाचे आहे.

रब्बी हंगामात हरभरा हे मुख्य पीक आहे. त्यापाठोपाठ ज्वारी, गहू याचा पेरा होतो. मात्र, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्यादृष्टीने हरभरा हेच पीक महत्वाचे आहे. त्यामुळे पेरणीपासून काढणीर्यंत शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला हवी याविषयी लातूरचे कृषी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कदम यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

पुर्वमशागत

रब्बी हंगामासाठी हलक्या स्वरुपाची मशागत आवश्यक असते. शिवाय यंदा पावसामुळे आगोदरच पेरणीला उशीर झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नांगरण, मोगडणी न करता बैलाने किंवा ट्रक्टरच्या सहाय्याने शेत रोटरुन पेरणीयोग्य करणे आवश्यक आहे. जमिनीत ओल असताना पेरणीला सुरवात करायची आहे.

बीजप्रक्रीया केल्याशिवाय पेरणीच करु नये

दरवर्षी शेतकरी हे पारंपारिक पध्दतीने पेरणीला सुरवात करतात. पण यंदा बीजप्रक्रीया करुनच पेरणी करावी लागणार आहे. म्हणेज रासायनिक खताची मिसळण किंवा जैविक पध्दतीने ही बीजप्रक्रिया करावी लागणार आहे.यामुळे हरभऱ्याला जो मर रोगाचा धोका असतो तो कमी होतो. शिवाय यंदा अधिकच्या पावसामुळे जमिनीत पाणी आहे. त्यामुळे जमिनीत बुरशीचेही प्रमाण असणार आहे. यापासून पेरणी केलेल्या बियाला धोका होऊ नये म्हणून ही बीजप्रक्रिया महत्वाची आहे.

बीबीएफ पध्दतीने पेरणी गरजेची

‘बीबीएफ’ या यंत्राच्या सहाय्याने हरभऱ्याची पेरणी करावी ज्या शेतकऱ्यांना हे शक्य नाही त्यांनी टिफणीचे एक नळ हे बंद करुन पेरणी करावी. जेणेकरुन पिकामध्ये अंतर राहणार आहे. शिवाय आता नव्याने टोकण पध्दतीचाही वापक मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे विशिष्ट अंतरावर तर पेरणी होतेच शिवाय कमी पाण्यात पीक हे जोमात येते. यंदाच्या पावसाळ्यात या टोकण पध्दतीचा फायदा सोयाबीन उत्पादकांना झालेला आहे. त्यामुळे रब्बीत विशेष: हरबरा पेरताना या टोकण पध्दतीचा वापर फायदेशीर ठरणार आहे.

पाण्याचे नियोजन

पेरणी केलेल्या क्षेत्रामध्ये ओल उडाली तर पाणी द्यावे लागणार आहे. हरभरा या पीकाला किमान तीन वेळेस पाणी देणे आवश्यक आहे. पेरणीनंतर 30 दिवसांनी पहिले पाणी त्यानंतर फुटवे जास्त निघतात त्यावेळी दुसरे पाणी आणि फुल लागण्याच्या काही काळ आगोदर पाणी दिले तर उत्पादनात वाढ होणार आहे. त्यामुळे पेरणी आणि पिकाची जोपासना योग्य प्रकारे केली तर उत्पादनात वाढ होणार आहे. (Proper planning required during rabi season, farmers get opportunity to increase production)

यंदा मुबलक प्रमाणात पाणी आहे. रब्बीच्या पेरणीला थोडा वेळ झाला असला तरी त्याचा उत्पादनावर काही परिणाम होणार नाही. पाण्याचे योग्य नियोजन केल्यास रब्बीतील सर्वच पिके मोठ्या जोमात येणार आहेत. खरीपात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असले तरी ते रब्बीतून भरून काढण्यासाठी पोषक वातावरण आहे. : कृषी उपविभागीय अधिकारी, राजेंद्र कदम, लातूर

संबंधित बातम्या :

लाळ्या-खुरकूताने 35 जनावरे दगावली ; अशी घ्या जनावरांची काळजी

कापूस विका पण गरजेपुरता अन् उरलेल्या कापसाचे ‘सोनं’ करा, शेतकऱ्यांना लाखमोलाचा सल्ला

दुष्काळात तेरावा : र्टसर्किटने 10 एकरातील ऊसाचा फड जळून खाक ; लाखोंचे नुकसान