दुष्काळात तेरावा : शॉर्टसर्किटने 10 एकरातील ऊसाचा फड जळून खाक ; लाखोंचे नुकसान

डवणी तालुक्यातील काडीवडगाव येथे शॉर्टसर्किटमुळे 10 एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. या 10 एकराच्या क्षेत्रावर तीन शेतकऱ्यांचा ऊस होता. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे.

दुष्काळात तेरावा : शॉर्टसर्किटने 10 एकरातील ऊसाचा फड जळून खाक ; लाखोंचे नुकसान
वडवणी तालुक्यात शॉर्टसर्किटने ऊस जळून खाक झाला

बीड : नैसरर्गिक संकट कमी म्हणून की काय आता शेतकऱ्यांना सुलतानी संकटाचाही सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांवरील संकटाची ही मालिका सुरुच आहे. (Beed) गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उघडीप दिला असल्याने कुठे दुर्घटना नव्हती मात्र, वडवणी तालुक्यातील काडीवडगाव येथे शॉर्टसर्किटमुळे 10 एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. (Sugarcane burnt) त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. या 10 एकराच्या क्षेत्रावर तीन शेतकऱ्यांचा ऊस होता. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे.

वडवणी तालुक्यातील काडीवडगावच्या शिवारात शेतकरी रामेश्वर अच्युतराव बडाडे, एकनाथ शेषराव बडे आणि महारुद्र दत्तात्रेय राऊत यांचा सलगच 10 एकरावर ऊस होता. या तिन्ही शेतकऱ्यांनी ऊसाची योग्य पध्दतीने जोपासना केली होती. यामुळे ऊसातून भरघोस उत्पादन मिळेल असा आशावाद होता मात्र, शॉर्टसर्किटने तब्बल 10 एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. ऐन तोडणीला आलेला ऊस अशाप्रकारे जळाल्याने शेतकऱ्यांते मोठे नुकसान झालेले आहे. शेतात आग लागल्याचे पाहताच शेजाऱ्यांनी ती विझवण्याचा प्रयत्न केला मात्र, आगीचे स्वरुप हे वाढतच गेले. त्यामुळे काही वेळातच ही आग आटोक्याच्या बाहेर गेली.

यामध्ये या तीन शेतकऱ्यांचे तब्बल 10 लाखाचे नुकसान झाले आहे. अवघ्या काही दिवसांनी हा ऊस कारखान्यावर जाणार होता पण त्यापुर्वीच ही दुर्घटना घडली. या फडातून विदुयत तारा मार्गस्थ झाल्या होत्या. वेळोवेळी विद्युत खांब इतरत्र हलवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. मात्र, याकडे महावितरणचे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. आगीत लाखो रूपयाचे नुकसान झाले असून सुदैवाने कसलीही जीवितहानी झाली नाही. मात्र महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे अशा घटना घडत आहेत. याचा फटका शेतकर्‍यांना बसत असून त्यांची स्वप्न धुळीस मिळत असल्याचे दिसत आहे.

महावितरणे नुकसानभरपाई द्यावी

शेतशिवारातील विद्युत तारा ह्या लोंबकाळत आहेत. येथील दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती मात्र, महावितरणचे सातत्याने दुर्लक्ष झाले आहे. या घटनेला महाविरणच जबाबदर असून नुकसानभरपाई देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. विद्युत वाहिनी तुटल्याने शॉर्टसर्किट झाले. यामुळे शेतातील ऊसाला आग लागली. क्षणार्धात ही आग सर्वत्र पसरली आणि दहा एकरवरील ऊस भस्मसात झाला. यामुळे शेतकर्‍याचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

डोळ्यादेखत स्वप्नांचा चुराडा

नैसर्गिक संकटाचा सामना करीत या तीन शेतकऱ्यांनी ऊसाची जोपासना केली होती. आता ऊस कारखान्यावर गेल्यावर लाखोंचे उत्पादन होईल असा आशावाद होता. पण भरदुपारीच आग आग लागली. हे तीन्ही शेतकरी शेतात असून काही करु शकले नाहीत. त्यांच्या डोळ्या देखत स्वप्नाचा चुराडा झाला. होत असताना शेतकरी मात्र हतबल झाले होते. दरम्यान या नुकसानीची भरपाई महावितरणने द्यावी, अशी मागणी होत आहे. (Short circuit burns 10 acres of sugarcane, damages farmer in Beed district)

संबंधित बातम्या :

अतिवृष्टीने फेरले स्वप्नांवर पाणी… कशी करावी लेकीची पाठवणी?

तयारी रब्बीची : खतांची खरेदी करताय, मग ‘अशी’ घ्या काळजी

कांद्याचा वांदा : खरीपातील कांद्याची लागवड जोमात, काय राहतील भविष्यात दर?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI