अतिवृष्टीने फेरले स्वप्नांवर पाणी… कशी करावी लेकीची पाठवणी?

पावसाने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला आपल्या मुलीचे कन्यादान सुध्दा करता आलेले नाही. ही अतिशोक्ती वाटेल पण हा प्रकार घडला आहे. (Aurangabad) औरंगाबाद जिल्ह्यातील विहममांडवा येथे. घरात आठराविश्व दारिद्र त्यात अतिवृष्टीचा अवकृपा त्यामुळे सर्वकाही मातीमोल झालं आहे. त्यामुळे मुलाीचे लग्न करण्यासाठीही त्यांच्या काही उरलेले नाही. या नैसर्गिक संकटामुळे मुलीची पाठवणी तरी करावी कशी असा प्रश्न त्या शेतकऱ्यासमोर होता.

अतिवृष्टीने फेरले स्वप्नांवर पाणी... कशी करावी लेकीची पाठवणी?
संग्रहीच छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 6:31 PM

औरंगाबाद : आतापर्यंत अतिवृष्टीने पीकाचे, शेतीचे नुकसान झाल्याचे आपण पाहिले होते पण या पावसामुळे कुणाचा संसार थाटायचा थांबेल असे कुणालाही वाटले नसेल पण हे झाले आहे. (Heavy Rain) पावसाने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला आपल्या मुलीचे कन्यादान सुध्दा करता आलेले नाही. ही अतिशोक्ती वाटेल पण हा प्रकार घडला आहे. (Aurangabad) औरंगाबाद जिल्ह्यातील विहममांडवा येथे. घरात आठराविश्व दारिद्र त्यात अतिवृष्टीचा अवकृपा त्यामुळे सर्वकाही मातीमोल झालं आहे. त्यामुळे मुलाीचे लग्न करण्यासाठीही त्यांच्या काही उरलेले नाही. या नैसर्गिक संकटामुळे मुलीची पाठवणी तरी करावी कशी असा प्रश्न त्या शेतकऱ्यासमोर होता. त्यामुळे लग्नसमारंभच नंतर करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. सर्वकाही रितीरिवाजाप्रमाणे ठरले होते. लग्नाची तारीख जवळ येताच अतिवृष्टीने हाहाकार केला आणि खरीपातील पीके ही उध्वस्त झाली त्यामुळे लग्नाचा खर्च तरी करावा कसा असा प्रश्न त्या अत्पभुधारक शेतकऱ्यासमोर उभा राहिला होता.

निसर्गाची अवकृपा काय असते याचा प्रत्यय औरंगाबाद जिल्ह्यातील विहामंडळ सर्कलमधील गब्दुद वस्ती येथे आला आहे. येथील शेतकरी विश्वास गब्दुद यांच्या मुलीचे लग्न जमले होते, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छोट्याखानीच लग्नसमारंभ करायचेही ठरले होते. मात्र, ज्या खरीपातील पीकाच्या उत्पादनावर लग्नसोहळ्याची स्वप्न रंगवली जात होती तीच पीकं एका रात्रीत होत्याची नव्हती झाली. पावसाने सर्वकाही हिरावून घेतले होते. साध्या पध्दतीनेही लग्न करण्याची आता स्थिती राहिली नसल्याचे शेतकरी विश्वास यांनी पीटीआय ला सांगितले आहे.

त्यामुळे अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे एखाद्याचा संसारही थाटला गेला नाही. या वस्तीवरच्या नागरिकांनी अगदी साध्या पध्दतीने लग्नसोहळा उरकण्याचा सल्लाही दिला मात्र, आवश्यक असलेला माल खरेदीसाठी पैसे नसल्याचे विश्वास यांनी सांगितले आहे. पावसामुळे लग्नाचा मुहुर्त तर आता टळला आहे. निसर्गाचा प्रकोप झाल्यावर याचा कशावर काही परिणाम होईल हे सांगता येत नाही.

हातातोंडाशी आलेला घास हिसकावला

खरीप हंगामातील काढणी काही दिवसांवर येऊन ठेपली होती. याच उत्पादनातून विश्वास यांनी आपल्या मुलीचा विवाह करण्याचे ठरवले होते. पण गेल्या काही दिवसांपासून पावसामध्ये सातत्य राहिले. अतिवृष्टीने सोयाबीन, उडीद पीकाचे न भरुन निघणारे नुकसान झाले होते. काढणीही मुश्किल झाली होती. या नुकसानीमुळे पैसेच नसल्याने अखेर लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचे विश्वास यांनी सांगितले आहे. सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी शेतामध्ये जागोजागी पाणी साचलेले आहे. शेतामध्ये जाणेही मुश्किल झाले आहे. खरीप हातचा गेला असून सध्याही पाणी हे साचलेलेच आहे. त्यामुळे रब्बी हंगामाच्या आशाही धूसर झालेल्या आहेत.

चांगल्या उत्पादनाची होती आशा

हंगामाच्या सुरवातीलाच चांगला पाऊस झाल्याने खरीपातील पीके ही जोमात होती. मध्यंतरी पावसाने ओढ दिली मात्र, त्यानंतर पावसाने हजेरी लावल्याने पीके बहरत होती. या पीकाच्या उत्पादनावरच मुलीचे लग्न करायचा निर्णय विश्वास यांनी घेतला होता. पण अतिवृष्टीने सर्वकाही मातीमोल झाले. अन्यथा यंदा विक्रमी उत्पादन होण्याचा विश्वास य़ेथील शेतकऱ्यांनी व्यक्त केला होता.

पीकेच नाहीतर शेतीही खरडून गेली

विहामंडवा हे औरंगाबादपासून 80 किलोमीटर अंतरावर आहे. दुष्काळी भाग म्हणून याची ओळख आहे. पण यंदा येथे सरासरीच्या 241.9 टक्के पाऊस पडला. महसूल विभागाच्या म्हणण्यानुसार, या पावसाळ्यात 564.6 मिमी च्या तुलनेत 1365.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सोयाबीन, कापूससारख्या पिकांच्या चांगल्या उत्पन्नाची शेतकऱ्यांना अपेक्षा होती, परंतु गेल्या महिन्यात पीक जवळजवळ कापणीस तयार असताना मुसळधार पाऊस पडला. शेतकरी विश्वास यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे त्यांच्या शेतातील सुमारे दोन ते तीन इंच वरच्या मातीचा थर वाहून गेला आहे. त्यामुळे पीकाचे तर नुकसान झालेच आहे पण पुढील हंगामातील पिक घेण्यासाठी जमिनच शिल्लक राहिलेली नाही.

सर्वकाही ठप्प, आता फक्त जगण्याची आशा

एखाद्या नैसर्गिक संकटामुळे कुटुंब कसे उध्वस्त होते हे विश्वास यांच्या बाबतीत झाले आहे. लग्नसमारंभ अगदी साध्या पध्दतीने करु असे त्यांना वस्तीवरच्या ग्रामस्थांनी सांगितले होते. पण आवश्यक साहित्य आणि कपडे खरेदी या बाबी तर सोडाच पण या खरेदीला जाण्यासाठी माझ्या गाडीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठीही पैसे नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे हालाकीची परस्थिती आणि त्यात नैसर्गिक संकट यामुळे लग्न लांबणीवर टाकण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढावलेली आहे. अधिकच्या पावसामुळे या मंडळातील सर्व पीके ही मातीमोल झाल्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले. (Heavy rains affect wedding ceremony, farmer’s daughter not married in Aurangabad)

इतर बातम्या :

अखेर राज्य महिला आयोगाला अध्यक्ष मिळाला! सरकारकडून रुपाली चाकणकर यांची नियुक्ती

VIDEO: दबाव झुगारून बेकायदा बांधकामे पाडा, मी तुमच्या पाठीशी आहे; मुख्यमंत्र्यांच्या पालिकेला कडक सूचना

Aryan Khan : आर्यन खानची मुंबई हायकोर्टात धाव, विशेष NDPS कोर्टाच्या निर्णयाला आव्हान, दिलासा मिळणार?

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.